esakal | सतत होणाऱ्या दहनामुळे वितळले स्मशानभूमीतील ब्रॅकेट!
sakal

बोलून बातमी शोधा

Cremation

सतत होणाऱ्या दहनामुळे वितळले स्मशानभूमीतील ब्रॅकेट!

sakal_logo
By
भारत मोगल

कसबे सुकेणे (जि. नाशिक) : कसबे सुकेणे येथील बाणगंगा नदीतीरी असलेल्या स्मशानभूमीतील मृतदेह (dead body) जाळण्यासाठी आवश्यक असलेले विशेष धातूचे (Metal) ब्रॅकेट वितळले आहे. सरासरी चार ते पाच वर्षांनंतर ब्रॅकेट (Brackets) बदलले जाते. मात्र चालू वर्षी एक वर्षाच्या आत ग्रामपंचायतीवर ब्रॅकेट बदलण्याची वेळ आली आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कोरोनामुळे (corona virus) कसबे सुकेणेतील वाढलेले मृत्युदराचे (Death rate) प्रमाण होय. (constant combustion melted the brackets in the cemetery)

वाढत्या मृत्यदराचा परिणाम

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरापासून ते गावापर्यंत मृत्यूचे प्रमाण वाढल्याने स्मशानभूमीत रांगा लागल्याचे दृश्य सर्वत्र दिसत आहे. कसबे सुकेणे येथेही वेगळे चित्र नाही. कसबे सुकेणे येथील जे नागरिक नाशिक, ओझर किंवा इतरत्र राहतात, अशा व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार कसबे सुकेणे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामपंचायत प्रशासनाने बाहेर राहणाऱ्या कुठल्याही कसबे सुकेणेतील कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकाला स्मशानभूमीत प्रवेश नाकारला नाही. यामुळे वर्षभरातील मृत्युदर वाढल्याने येथील स्मशानभूमीतील ब्रॅकेट एक वर्षाच्या आत अतिउष्णतेमुळे वितळले आहेत. कोरोनापूर्वी मात्र ग्रामपंचायतीच्या प्रशासनाकडून सरासरी चार ते पाच वर्षांनंतर ब्रॅकेट बदलले जाते.

हेही वाचा: Coronavirus : दम्याचा त्रास आहे? मग घ्या विशेष काळजी

''कसबे सुकेणे येथील स्मशानभूमी अद्ययावत आहे. मात्र दोन महिन्यांपासून मृत्युदर वाढल्याने स्मशानभूमीतील ब्रॅकेट वितळण्याचा प्रकार दिसून आला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला एक वर्षाच्या आत ब्रॅकेट बदलण्याची वेळ आली आहे.''

-धनराज भंडारे, उपसरपंच, कसबे सुकेणे

हेही वाचा: बाबो, केवढी ही गर्दी; गुजरातमध्ये कोरोना नियम धाब्यावर (Video)