Nashik News: मनमाडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे बांधकाम निकृष्ट

Rajendra Jadhav, Madhav Shelar while submitting a statement demanding an inquiry into the shoddy construction of the full-length statue of Chhatrapati Shivaji Maharaj
Rajendra Jadhav, Madhav Shelar while submitting a statement demanding an inquiry into the shoddy construction of the full-length statue of Chhatrapati Shivaji Maharajesakal

Nashik News : शहरातील नियोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने ते बंद आहे.

सदर काम मंजूर आराखडा आणि अंदाजपत्रकानुसारच करून बोगस कामाची चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी राष्ट्रवादी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव आणि शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख माधव शेलार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व्ही.एन.दराने यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. (Construction of full length statue of Chhatrapati Shivaji Maharaj at Manmad bad construction Nashik News)

आमदार सुहास कांदे यांनी विशेष प्रयत्न करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा मंजूर करून आणत त्यास ५० लाख रुपये निधी उपलब्ध केला आहे. शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे मेघडबरीसह पूर्णाकृती बसवण्याचे काम सुरू आहे.

या बांधकामाचे आराखडा आणि अंदाजपत्रकानुसार होत नसल्याने अनेक चुका आढळून आल्या आहेत. ठरलेल्या मानकानुसार काम होत नाही. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे.

बांधकामासाठी वापरलेले बांधकाम साहित्य, वाळू, सिमेंट, खडी, लोखंडी सळई आणि इतर साहित्य हे हलक्या आणि निकृष्ट दर्जाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे निकृष्ट दर्जाचे काम केले जात असल्याने हे काम बंद करण्यात आले आहे.

अशीच स्थिती महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याबाबत झाली आहे. त्यामुळे ५० लाख रुपये निधी मंजूर असताना सदर बांधकाम निकृष्ट होत आहे. मंजूर आराखडा आणि अंदाजपत्रकानुसार का केले जात नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Rajendra Jadhav, Madhav Shelar while submitting a statement demanding an inquiry into the shoddy construction of the full-length statue of Chhatrapati Shivaji Maharaj
Nashik News : मालेगावला उड्डाणपूल तळ बनले कचऱ्याचे आगार; महापालिकेचे दुर्लक्ष

याकडे पालिकेच्या किंवा संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाचा दर्जा तपासणारे अधिकारी करतात तरी काय? असा सवाल पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

या बांधकामात मोठा गैरव्यवहार होत असून त्याची सखोल चौकशी करावी, संबंधित ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावे, सदर पुतळ्याचे बांधकाम हे अनुभवी स्थानिक बांधकाम व्यावसायिकास द्यावे, बांधकामावर देखरेख ठेवण्यासाठी स्थानिक नागरिकांची समिती स्थापन करावी त्यात वेगवेगळ्या नागरिकांचा समावेश असावा.

आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

Rajendra Jadhav, Madhav Shelar while submitting a statement demanding an inquiry into the shoddy construction of the full-length statue of Chhatrapati Shivaji Maharaj
Nashik News : नाशिकसह 4 तालुक्यांसाठी अडीच कोटींचा निधी; भाजप नेते दिनकर पाटील यांचे यश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com