महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते संमेलनाच्या मुख्य मंडपाचे भूमीपूजन | Marathi Sahitya Sammelan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi Sahitya Sammelan

Nashik | मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडपाचे भूमीपूजन

sakal_logo
By
तुषार महाले

नाशिक : संमेलन मुख्य मंडप उभारणी दिमाखदार सोहळ्याने संमेलनाची सुरवात झाली आहे. नाशिकचा प्रथम नागरिक म्हणून साहित्य संमेलन चांगले कसे पार पडेल याकडे लक्ष दिले जाईल. नाशिककर तसेच महानगरपालिका संमेलनात अग्रेसर राहतील असा विश्वास महापौर सतीश कुलकर्णी यांनी व्यक्त केला. कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या मैदानात संमेलन मुख्य मंडप उभारणी सोहळा महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा: जोरदार टीकेनंतर 3 दिग्गज नेत्यांच्या मनमोकळ्या गप्पा! चर्चेला उधाण

नाशिकला तिसऱ्या साहित्य संमेलनाचा योग जुळून आला आहे, कोरोनामुळे संमेलन लांबणीवर पडले, परंतू महाराष्ट्रातून येणाऱ्या साहित्यिक, कवींना भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रांगणात तीन दिवसात संमेलनाचा आनंद घेता येणार आहे, दरम्यान आयोजन करणे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून नक्कीच शिकले पाहिजे साहित्यिकांना संमेलनात काही गोष्टी खटकल्या तर संमेलनावर परिणाम होतो. त्यामुळे कुठलीही कमतरता राहणार नाही यासाठी काळजी घ्यावी असे त्यांनी नमूद केले.


ठरलं ! कादंबरीकार विश्वास पाटील करणार उद्घाटन

नाशिकमध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकाचे नाव मोठ्या प्रतिक्षेनंतर संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले. कादंबरीकार विश्वास पाटील शुक्रवारी संमेलनाचे उद्घाटन करणार असून संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित असणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून गीतकार जावेद अख्तर असतील. रविवारी (ता.५) संमेलनाचा समारोप शरद पवार यांच्या हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी न्यायमुर्ती नरेंद्र चपळगावकर उपस्थित असतील.


सारस्वतांची पंढरी गजबजून उठेल : स्वागताध्यक्ष भुजबळ

नाशिक ही साहित्यनगरी असून या नगरीत कवी कुसुमाग्रज, बाबुराव बागुल, वामनदादा कर्डक असे अनेक साहित्यिक होवून गेले आहे. संमेलन चांगले होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असून मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सारस्वतांची पंढरी गजबजून उठेल. संमेलन काही दिवसांवर आले असून शहरात उत्साह निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावे, भाषा राज्य, देश, निर्माण करण्याचे काम करते, मराठी भाषेचे हजार वर्षांपूर्वीचे पुरावे समितीसमोर मांडले असून दिल्ली दरबारी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भाषा समृद्ध व्हावी, साहित्यिकांचे गुणगाण व्हावे, भाषा आईसारखी असून तिला सांभाळण्याची गरज असून साहित्यिक मंडळी काम करणारी आहेत असे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नमूद केले. दरम्यान, छगन भुजबळ यांनी भारती पवारांचा नवोदित कवियत्री म्हणून उल्लेख केला.

हेही वाचा: अरे वा! नांदूरमध्यमेश्वरमध्ये उतरले रोहित

मराठी साहित्य संमेलन उजवे ठरेल : राज्यमंत्री भारती पवार

नाशिकमध्ये याआधी दोन संमेलन झाली आहेत. ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन त्यापेक्षा उजवे ठरेल. नाशिकमध्ये काहीतरी नवीन घडविण्यासाठी संमेलन दिशादर्शक ठरणार असून कोरोनाचे आव्हान पेलत संमेलन होत आहे. संमेलन नाशिकमध्ये होत असल्याचा अभिमान असून अविस्मरणीय ठरेल असे आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी नमूद करताना नाशिक साहित्यिकांची कर्मभूमी असून सारस्वतांच्या महोत्सवाला कवितेच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी, स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महापौर सतीश कुलकर्णी, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडे, संमेलनाचे मुख्य समन्वयक समीर भुजबळ आदींसह संमेलन पदाधिकारी उपस्थित होते. सुत्रसंचालन मुकुंद कुलकर्णी यांनी केले.

loading image
go to top