आधी टीकेची झोड; मग एकाच सोफ्यावर मनमोकळ्या गप्पा! 3 दिग्गज नेते एकत्र? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bhujbal raut patil

जोरदार टीकेनंतर 3 दिग्गज नेत्यांच्या मनमोकळ्या गप्पा! चर्चेला उधाण

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नाशिक : महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. एरव्ही एकमेकांविरोधात टिका करत असलेले दिग्गज नेते आज मात्र एका वेगळ्याच मूडमध्ये पाहायला मिळाले. शिवसेना खासदार संजय राऊत (shivsena mp sanjay raut) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (bjp chandrakant patil) आणि छगन भुजबळ (ncp Chhagan bhujbal) या तिघांमध्ये नेहमी वादविवाद, खडाजंगी पाहायला मिळात होती. मात्र, आजचं चित्र काही वेगळंच होत.. निमित्त होतं नाशिकमध्ये रंगलेल्या लग्नसोहळ्याचं...

आधी टीका, मग सोफ्यावर बसून मनमोकळ्या गप्पा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. त्यावरुन राजकीय चर्चा व टिकास्त्रही करण्यात आले. खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि मोदींवर जोरदार टोलेबाजी केली. तर चंद्रकात पाटील यांनी देखील पक्षाची बाजू सावरत पंतप्रधानांनी नाईलाजाने आणि दुःखाने निर्णय घेतल्याचे सांगत खंत व्यक्त केली. त्यावरुनही संजय राऊत यांनी आज पत्रकारांसमोर चंद्रकांत पाटलांवर टीका केली. माझा शोक संदेश चंद्रकांत पाटील यांना पाठवेल. त्यांच्यासाठी हा शोक असेल तर त्यासाठी आपण शोकसभा घेऊ. देश उत्सव साजरा करत असेल तेव्हा जर कुणाला शोक वाटत असेल तर त्यांची मानसिकता तपासावी लागेल, असे संजय राऊत म्हणाले. मात्र थोड्या वेळानंतर नाशिकच्या भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यादरम्यान काही वेगळं चित्र पाहायला मिळालं..आज संजय राऊत, छगन भुजबळ आणि चंद्रकांत पाटील एकाच सोफ्यावर बसून गप्पा मारताना दिसले...

हेही वाचा: 'आता मोदी सरकारने 'हे' देखील मान्य करावं' : राहुल गांधी

विरोधक असले तरी त्यांची लग्नानिमित्ताने मैत्री

भाजप आमदार फरांदे यांच्या मुलीचा विवाह सोहळा आज पार पडला. या सोहळ्यात चंद्रकांतदादांनी भुजबळांना टाळीही दिली. तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी भुजबळांना नमस्कारही केला. यावेळी संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील यांच्यात चांगली चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. यावेळी तिघांमध्ये जोरदार हास्य पाहायला मिळाले. हे राजकारणातील विरोधक असले तरी त्यांची लग्नानिमित्ताने मैत्री पाहायला मिळाली. या सोहळ्याला छगन भुजबळ, चंद्रकांत पाटील, संजय राऊत यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित राहिले. यावेळी भुजबळ, पाटील आणि राऊत एकाच सोफ्यावर बसलेले पाहायला मिळाले. एका बाजूला पाटील, दुसऱ्या बाजूला राऊत आणि मधे भुजबळ बसले होते. यावेळी या तिन्ही नेत्यांमध्ये मनमोकळ्या गप्पा झाल्या.

हेही वाचा: 'आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, दोन वर्षांपूर्वीच महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला'

loading image
go to top