Latest Crime News | वॉचमनने केला बांधकाम मजुराचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Crime News

Nashik Crime News : वॉचमनने केला बांधकाम मजुराचा खून

पंचवटी (जि. नाशिक) : म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीतील वाढणे कॉलनीतील हनुमान मंदिराजवळ बांधकाम सुरू असलेल्या साइटवर काम करणाऱ्या वॉचमन व बिगारी यांच्यामध्ये दारूच्या नशेत झालेल्या वादातून बिगाऱ्याचा खून झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितास ताब्यात घेतले आहे. (construction worker killed by watchman at panchavati Nashik Latest Crime News)

हेही वाचा: Marathi Rangbhoomi Din : रंगभूमीवर नाटकांची पुन्हा नांदी!

याबाबत अधिक माहिती अशी की, म्हसरूळ शिवारातील वाढणे कॉलनीतील हनुमान मंदिराजवळ सुरू असलेल्या बांधकाम साइटवरील वॉचमन आणि बिगारी यांच्यात गुरुवारी (ता.३) रात्री दारूच्या नशेत वाद झाले होते. या बांधकाम साइटवर वॉचमन म्हणून काम करणाऱ्या संशयित योगेश डंबाळे (२७, हल्ली मुक्काम नाशिक, मुळ रा. ननाशी, जि. नाशिक) यांनी मयत सतलाल मुकूरी प्रसाद (४०, हल्ली मुक्काम नाशिक, रा. नाहर छापला पडरोना कुशीनगर, उत्तर प्रदेश) यास बहिणीकडे वाईट नजरेने बघतो, म्हणून शाब्दिक वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले.

संशयित योगेश याने मृताच्या डोक्यात पाठीमागून जड हत्याराने वार केला. मयत सतलाल साइटवर असलेल्या लाकडी बल्ल्यांच्या ढिगाऱ्यावर पडला. डोक्याच्या मागच्या बाजूला जबर मार लागल्याने मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त अमोल तांबे, सहायक आयुक्त गंगाधर सोनवणे, वरिष्ठ निरीक्षक अशोक साखरे, म्हसरूळ गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी धाव घेतली व पाहणी केली. परंतु, वेळीच सतपाल प्रसाद यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असते, तर कदाचित त्याचे प्राण वाचले असते.

हेही वाचा: Nashik : होळकर, रामवाडी पुलाची दैना; दुरवस्थेमुळे गंभीर दुर्घटना होण्याचा धोका