Nashik : होळकर, रामवाडी पुलाची दैना; दुरवस्थेमुळे गंभीर दुर्घटना होण्याचा धोका

The bridge has fallen into such disrepair due to lack of maintenance.
The bridge has fallen into such disrepair due to lack of maintenance.esakal

पंचवटी (जि. नाशिक) : नाशिकमधील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अहिल्याबाई होळकर पुलाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. तर रामवाडी येथून घारपुरे घाटाकडे जाणाऱ्या पुलाची पुरती दैना झाली आहे. त्यामुळे हे दोन्ही पूल धोकादायक स्थितीत जाण्याआधी दुरुस्त करण्याची गरज आहे. (holkar Ramwadi Bridge damaged Risk of serious accident due to poor condition Nashik Latest Marathi News)

The bridge has fallen into such disrepair due to lack of maintenance.
Nashik : रेल्वेला भीषण आग; अग्निशमन दलाचे बंब दाखल

या दोन्ही पुलांचे अनेक ठिकाणी संरक्षित कठडे तुटले आहेत. होळकर, रामवाडी पुलाचे कठडे तुटलेले तर बऱ्याच ठिकाणी बोगदे पडले आहेत. तसेच होळकर पुलाला समांतर बांधण्यात आलेल्या पुलाच्या बाजूस असलेल्या चारीमध्ये कचरा कायमच असतो. त्यामुळे डासांचेही प्रमाण वाढले आहे. मनपा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्याची तातडीने दुरुस्त होण्याची गरज आहे. निर्माल्य टाकू नये अशा आशयाचा फलक असलेल्या ठिकाणी कचरा साचला आहे.

नाशिक शहर आणि पंचवटीला जोडणाऱ्या या दोन महत्त्वाच्या पुलांच्या झालेल्या दुरवस्थेमुळे गंभीर दुर्घटना होण्याचा धोका आहे. या पुलावरून हजारो दुचाकी, चारचाकी वाहनाची वर्दळ असते. आजरोजी शाळा बंद आहे. नाहीतर या पुलावरून लहान शालेय विद्यार्थी हे पायी शाळेत ये-जा करीत असतात. होळकर पुलावर पाणी मोजण्यासाठी एक केबिन असून त्या बाहेर निर्माल्य, कचरा जमा झाल्याने तेथे दुर्गंधी पसरली आहे.

रामवाडी पुलाचे सौंदर्य पाण्यात

रामवाडी परिसरात गोदावरी नदीवर बांधलेल्या पुलाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पुलाच्या जवळपास सर्व संरक्षक जाळ्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यांना अनेक ठिकाणी ठिगळ लावण्यात आले आहे. मात्र, तरीही मोठमोठे बोगदे पाहायला मिळत आहेत. अशा पद्धतीने केलेल्या डागडुजीमुळे पुलाचे सौंदर्य नष्ट झाले आहे. स्मार्टसिटीमध्ये जायचे असेल तर या पुलाकडेदेखील गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

The bridge has fallen into such disrepair due to lack of maintenance.
Nashik Crime News : शहरात विनयभंगाच्या घटनांत वाढ!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com