Nashik News: टाटा एआयजी इन्शुरन्स कंपनीकडून ग्राहकाची दिशाभूल

The crack on the front mirror in the first photo is from before the policy was taken out, based on an old photo. The second photo shows the actual damage from the broken tree branch.
The crack on the front mirror in the first photo is from before the policy was taken out, based on an old photo. The second photo shows the actual damage from the broken tree branch.esakal

Nashik News : एरवी वाहनांचे इन्शुरन्स काढण्यासाठी सतत फोन कॉल करून सामान्य ग्राहकांना त्रास देणाऱ्या ‘टाटा एआयजी’ सारख्या प्रथितयश कंपनीकडून क्लेम सेटलमेंटवेळी मात्र ग्राहकांची दिशाभूल करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

The crack on the front mirror in the first photo is from before the policy was taken out, based on an old photo. The second photo shows the actual damage from the broken tree branch.
Crime News: धोका दिलेल्या प्रेयसीला संपवण्याचा प्लॅन; मित्रांच्या मदतीने पिस्तूल खरेदी केलं, काटा काढणार तोच...

इन्शुरन्स काढण्यापूर्वी सतत माहितीचा मारा करत पॉलिसी काढण्यासाठी पाठपुरावा करणारे कंपनी प्रतिनिधी प्रत्यक्ष क्लेमची वेळ आल्यानंतर मात्र त्यातून पळवाटा शोधण्याचा प्रयत्न करताना दिसतात. सातपूरमधील मारुती सर्व्हिस सेंटरमधील एका ग्राहकाला अशाच प्रकारच्या अनुभवाला सामोरे जावे लागले.

फ्रंट मिररला गेलेला तडा हा नवा नसून पॉलिसी काढण्यापूर्वीचा आहे, हे ठसविण्यासाठी जुन्या फोटोचा आधार घेण्यात आला. प्रत्यक्षात जी खूण जुन्या फोटोत दिसत आहे, त्यात आणि झाडाची मोठी फांदी पडून तुटलेल्या काचेचा काहीही संबंध नाही, ही बाब सचिन गुंजाळ या कंपनी प्रतिनिधीला सांगूनही केवळ क्लेम कमी करण्याच्या टार्गेटमुळे ग्राहकाला भुर्दंड बसत आहे.

केवळ क्लेम बसू नये, या उद्देशाने वागणाऱ्या कंपनी प्रतिनिधींवर कारवाई करून संपूर्ण क्लेम मंजूर न झाल्यास ग्राहक न्यायालयात जाण्याचा मार्ग पॉलिसीधारक निवडण्याची शक्यता संबंधितांनी बोलून दाखवली.

The crack on the front mirror in the first photo is from before the policy was taken out, based on an old photo. The second photo shows the actual damage from the broken tree branch.
Nashik News: गटारमिश्रित पाणीपुरवठ्याने गणेशवाडीतील रहिवासी त्रस्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com