पाचपट वृक्षलागवडीपासून पळ? कंत्राटदाराचे बंधपत्र सक्षम अधिकाऱ्याच्या मोहोरविनाच

chandwad vad.jpg
chandwad vad.jpg

चांदवड (नाशिक) : चांदवड-मनमाड रस्ता विस्तारीकरनात वृक्षतोडीच्या बदल्यात नव्याने पाचपट वृक्षलागवडीची आशा धुसर झाली आहे. झाडं लागवडीबाबत कंत्राटदाराने दिलेलं बंधपत्र कोणत्याही सक्षम अधिकाऱ्यासमोर केलेलं नाही. कोट्यवधी रुपयांचे कंत्राट असताना वृक्षलागवडीबाबत प्रतिज्ञापत्र अवघ्या शंभर रुपयांच्या स्टँपवर केले आहे. शिवाय त्यावर सक्षम अधिकाऱ्याची मोहोर नसल्याने या तांत्रिक चुकीकडे दुर्लक्ष वृक्षलागवडीपासून पळ काढण्यासाठी करण्यात आलं का, असा प्रश्न उपस्थित होतो. 

कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना अभय?

संबंधित कंत्राटदार कंपनीकडून वास्तविक महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांनी वृक्षलागवडीबाबतचे बंधपत्र करून घेताना ते सक्षम अधिकाऱ्यासमोर साक्षांकित करावयास हवे होते. रस्ता विस्ताकरणात वृक्ष गणनेपासून तर वृक्षतोडीसह वन्यजीव कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना अभय का दिलं जातंय, असा प्रश्न चांदवडकरांना सतावतो आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात झाडं तोडल्यानंतर त्याबदल्यात शासननियमानुसार तोडलेल्या झाडांच्या पाचपट झाडांची लागवड करून ती जगविण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची आहे. ती जबाबदारी नियमानुसार पार पाडण्यासाठीच त्यांच्याकडून बंधपत्र करून घेणं रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांचे काम आहे अन् इथेच त्यांनी कंत्राटदाराला सवलत दिली आहे. 

प्रसंगी उच्च न्यायालयाचे दार ठोठावणार

सुरवातीलाच अशापद्धतीने कंत्राटदारांवर वन विभाग, नगर परिषद व थेट रस्ते विकास महामंडळाने मेहरबानी केली आहे. तर अनेक वर्षांपासून प्रलंबित चांदवड-मनमाड रस्त्याचे काम तरी अंदाजपत्रकानुसार व नियमात होईल का नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या सर्व अनियमिततेवर जीवन नागरी पर्यावरण व प्राणी संरक्षण संस्थेचे सचिव विलास संसारे व ‘सकाळ’ने चांद‘वड’ कुठंय? या मालिकेद्वारे प्रकाशझोत टाकल्यानंतर अनेक पर्यावरणप्रेमी येत्या काळात मोठ्या आंदोलनासह प्रसंगी उच्च न्यायालयाचे दार ठोठावण्यासाठी सरसावणार आहेत. 

झाडांची नगर परिषद, ठेकेदार व एम.एस.आर.डी.सी. व वन विभाग चांदवड यांच्या संगनमताने सर्व नियम धाब्यावर ठेवून कत्तल झाली आहे. याबाबत ब्ल्यू पॅंथर्स सेवाभावी संस्थेने तहसीलदार, नगर परिषद, वन विभाग यांच्याकडे पत्रव्यवहार करूनही ठेकेदारावर कुठलीही कारवाई झालेली नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाही करावी. - पांडुरंग भडांगे, अध्यक्ष ब्ल्यू पँथर्स चांदवड 

चांदवड-मनमाड रस्ता विस्तारीकरणात वृक्षतोडीबाबत अनियमितता झाली आहे. यावर आम्ही पर्यावरणप्रेमी उच्च न्यायालयात लवकरच याचिका दाखल करणार आहोत. - विलास संसारे, सचिव- जीवन नागरी पर्यावरण व प्राणी संरक्षण संस्था  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com