Nashik News: सटाण्यातील वळणरस्ता, उड्डाणपुलाविषयी मतमतांतरे सुरूच! लवकर पूर्ण होणारा पर्याय स्वीकारावा

Bypass File photo
Bypass File photoesakal

सटाणा : कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला सटाणा शहर बाह्यवळण रस्ता किंवा पर्यायी उड्डाणपूल अशा दोन विचारधारांमध्ये सटाणा शहर वळण रस्ता सध्या सापडला आहे.

यापेक्षा कोणताही एक पर्याय, जो लवकर पूर्ण होईल तो मार्गी लावावा अशी भावना शहरवासीयांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे आधी शहरातील आहेत ते रस्ते रूंद करा, अतिक्रमणमुक्त करा अशी मागणीही पुढे येत असून तीदेखील अतिशय महत्त्वाची सूचना आहे. (Controversy continues about detour and flyover in Satane Take the early completion option Nashik News)

बायपास झाला तर, त्या बायपासच्या दुतर्फा भविष्यात शहरविकास होईल आणि शहरातील प्रदूषण नाममात्र कमी होण्यास मदत होईल. मात्र त्याअगोदर शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे.

बसस्थानकामागील ६० फुटी रस्त्यावरूनही रहदारीस सुरवात करावी. बसस्थानकाचे एक प्रवेशद्वार पूर्व बाजूलाही सुरू करता येऊ शकते. सोबत लिंक रोडचे कामही पूर्ण होणे गरजेचे आहे.

चौगाव रोड शेतकी संघाच्या इमारतीपासून जुन्या खोलपांदीतून जाणारा व चौगांवरोड ते अजमेर सौंदाणे रोड यांना जोडणारा रस्ता जो शेतकीसंघ, कब्रस्थान, कृषी उत्पन्न बाजार समिती, मारवाडी हौसिंग यांच्या उत्तर बाजूलगत जाणारा साठफुटी रस्ता आहे, त्याचे प्रलंबित आहे ते काम तातडीने पूर्ण करावे.

टॅक्सी स्टँण्ड ते भंगारवाडा लक्ष्मीनारायण ऑईल मिललगतचा जुना मालेगावरोड तयार करून काही रहदारी तिकडे वळविली तर वाहतूक सुरळीत व सुटसुटीत होईल.

बायपास झाला तरीही त्यावरून जाणारी वाहने शहरातून जाणारच नाहीत तसेच उड्डाणपूल झाला तरीही त्यावरुन जाणारी वाहने पुलावरून फक्त जातांना दिसतील पण त्यांचा सटाणा शहराशी थेट संबंध येणारच नाही.

उड्डाणपुलामुळे वडाळीभोई- पिंपळगावासारखे सटाणा शहराचे अस्तित्व संपेल अशी भीती व्यक्त केली जाते. मात्र प्रत्यक्षात त्या उड्डाणपुलाच्या सदोष डिझाईनमुळे वडाळीभोईच्या उड्डाणपुलाच्या पूर्ण लांबीमधे फक्त दोनच ठिकाणी बोगदे सोडून पूर्ण भरीव पूल केल्यामुळे वडाळी गावाचे विभाजन होऊन सरळ दोन तुकडे झाले.

कामाचा प्राधान्यक्रम ठरवा

नाशिक, पुणे, मुंबई सारखे वरूनही रस्ता आणि खालूनही रस्ता अशा डिझाईनचा उड्डाणपूल वडाळीला असता तर वडाळी गावाचे तुकडे झालेच नसते. या सर्व सुधारणा अपेक्षित आहेत.

त्या अगोदरच बायपास झाला तर शहराचा बकालपणा तसाच राहून तो वाढतच जाईल, भविष्यात सुनियोजित सटाणा होण्याऐवजी मालेगाव सारखे होऊन जाईल, त्यामुळे कोणते काम आधी याचा प्राधान्यक्रम निश्चित करायला हवा, रस्ता रुंदीकरण तसेच उड्डाणपूल आणि बायपास देखिल या तिन्ही मागण्या पूर्ण करण्यासाठीच श्रेयवादाच्या लढाईत न पडता सर्वपक्षीय प्रयत्न व्हायला हवेत.

Bypass File photo
Nashik Political News: ऑडिओ क्लीप व्हायरल करण्याची राजकीय खेळी! माणिकराव शिंदेंचा आरोप

...तर वाहतूक सुरळीत होईल

बायपास होईल तेव्हा होईल, पण त्याआधी सटाण्याची वाहतूक सुरळीत होण्यासाठी व अपघातमुक्त सटाणाच्या दिशेने विचार केल्यास, आधी आहे तो रस्ता रुंदीकरण व काँक्रिटीकरण करणे, त्यानंतर उड्डाणपूल झाला त्यावरुन जड वाहतूक निघून जाईल, खाली फक्त शहर वाहतूक राहील आणि शिवतीर्थ, एस.टी. स्टॅन्ड चौक, दोधेश्वर नाका या तिन्ही ठिकाणी सिग्नलची व्यवस्था केली तर सध्या कमीत कमी खर्चात सर्व वाहतूक सुरळीत होऊन बाजारपेठही सुस्थितीत होईल.

जनमताचा रेटा वाढावा

आधी आहेत ते रस्ते अतिक्रमणमुक्त करून, त्यांचे रुंदीकरण करणे, त्यानंतर उड्डाणपूल करणे आणि शेवटी बायपास देखिल आवश्यकच आहे, त्यामुळे प्रत्येक विषयात फायदे तोटे असतातच, त्यासाठी मते मतांतरे असावेत पण भविष्यासाठी जास्त फायद्याचे काय, याचा विचार होऊन त्या दिशेने जनमत तयार होणे काळाची खरी गरज आहे.

Bypass File photo
Nashik: ‘ऑनलाईन’च्या नावाखाली लाभार्थी धान्यापासून वंचित! तहसील कार्यालयाने दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com