esakal | आर्टिलरी सेंटरमध्ये प्रशिक्षणार्थींचा दीक्षान्त समारंभ
sakal

बोलून बातमी शोधा

आर्टिलरी सेंटरमध्ये प्रशिक्षणार्थींचा दीक्षान्त समारंभ

आर्टिलरी सेंटरमध्ये प्रशिक्षणार्थींचा दीक्षान्त समारंभ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : आर्टिलरी सेंटरमधील तोफखाना केंद्रातील प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत समारंभ उत्साहात झाला. अष्टपैलू कामगिरीबद्दल सर्वोत्कृष्ट नवसैनिक म्हणून कृष्णा कुमार यादव यांना सन्मानित करण्यात आले. तोफखाना केंद्राचे कमांडंट ब्रिगेडियर ए रागेश यांच्या हस्ते त्यांना पदक प्रदान करण्यात आले.

१९४८ साली आर्टिलरी सेंटरची स्थापना झाली. भारतीय सेनेचे हे सर्वात जुने व देशातील एक मोठे प्रशिक्षण केंद्र आहे. या केंद्रातून दरवर्षी निवड प्रक्रियेतून आलेल्या सुमारे साडेपाच हजार तरुणांना नवसैनिक म्हणून घडविले जाते. वरुणराजाच्या साक्षीने येथील उमराव मैदानावर लष्करी बॅन्ड पथकाने वाजविलेल्या विशिष्ट अशा लष्करी धुनच्या चालीवर नवसैनिकांच्या तुकडीने सशस्त्र संचलन करत उपस्थित वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना सॅल्यूट केला. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून तोफखाना केंद्राचे कमांडंट ब्रिगेडियर ए. रागेश उपस्थित होते.

या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी खुल्या जिप्सी वाहनातून मैदानावरील संचलनाची पाहणी केली. कोविड महामारीतही या केंद्रात सर्व खबरदाऱ्या घेऊन तोफखाना प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणार्थीची तुकडी बाहेर पडली. ४२ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. आर्टिलरी सेंटरमध्ये या प्रशिक्षणार्थींची शानदार पासिंग आउट परेड झाली. जवानांनी शानदार संचलन करून सलामी दिली. मनोबल वाढले. तोफखाना केंद्राचे कमांडंट ब्रिगेडियर ए रागेश यांनी संचलनाचे परीक्षण केले.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून त्यांनी प्रशिक्षणार्थींना प्रेरणा दिली. देशासाठी जवानांनी तन-मन-धन अर्पण करून या केंद्राचा, तसेच देशाचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भरतींचा सत्कारही करण्यात आला. रेक्ट (डीएमटी) कृष्ण कुमार यादव यांना एकंदरीत सर्वोत्कृष्ट भरती करंडक देण्यात आला. गौरव पदक अभिमानाचे चिन्ह, या भरती झालेल्या पालकांना समर्पित, प्रत्येक अभिमानी तरुण सैनिकाला सुपूर्द करण्यात आले.

loading image
go to top