Nashik News: मालेगावात कोथिंबीरला कवडीमोल भाव! आवक वाढल्याने 10 रुपयात पाच जुड्या

मालेगाव तालुक्यासह कसमादे परिसरातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी भाव मिळेल या आशेने कोथिंबीरची लागवड केली.
Coriander available for sale on Old Agra Road in Malegaon.
Coriander available for sale on Old Agra Road in Malegaon.esakal

मालेगाव : तालुक्यासह कसमादे परिसरातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी भाव मिळेल या आशेने कोथिंबीरची लागवड केली. कमी पाण्यात व कमी दिवसात कोथिंबीर येत असल्याने अनेक शेतकरी कोथिंबीर पिकाकडे वळाले होते. येथील भाजीपाला बाजारात गेल्या महिन्याभरापासून कोथिंबीरची आवक वाढली आहे.

आवक वाढल्याने कोंथिबीरच्या एका जुडीला अवघा दोन रुपये भाव मिळाला असून शहरात दहा रुपयात पाच जुड्या छोटे विक्रेते विक्री करत आहे. कोंथिबीरचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. (Coriander at bargain price in Malegaon Five pairs for 10 rupees due to increase in income Nashik News)

यावर्षी दुष्काळी परिस्थिती आहे. उपलब्ध पाण्यावर बहुसंख्य शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड केली आहे. डिसेंबर महिन्यात पालक, मेथीची भाजी, कोथिंबीर आदींची लागवड झाली. सध्या येथे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोथिंबीर, मेथी, पालक व कांदा पात विक्रीसाठी येत आहे.

कोथिंबीरच्या दरात मोठी घसरण झाली आहे. घाऊक बाजारात जुडी दोन रुपयाला मिळत आहे. महात्मा फुले भाजी मार्केट, इक्बाल डाबी, मच्छी बाजार, सलमताबाद, रावळगाव नाका, सटाणा नाका यासह विविध बाजारात कोथिंबीरची रेलचेल आहे.

Coriander available for sale on Old Agra Road in Malegaon.
Nashik Agriculture: बळीराजाला कांद्यापाठोपाठ द्राक्षही रडविणार! निर्यातीच्या खर्चात वाढ झाल्याने द्राक्ष उत्पादकांची वाढली चिंता

काही शेतकरी स्वतः बाजारात कोथिंबीर विक्री करीत आहेत. भाजीपाला बाजारात रोज सुमारे तीन टन कोथिंबीर येत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत भाज्यांच्या भावात घसरण कायम राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.

"वीस गुंठ्यात कोथिंबीरची लागवड केली होती. लागवड पासून ते काढणीपर्यत वीस हजार रुपये खर्च आला आहे. यातून खर्च सुद्धा निघाला नाही. शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी."- गोरख भोसले, कोथिंबीर उत्पादक शेतकरी, मळगाव

"कोथिंबीरची आवक फेब्रुवारी अखेरपर्यत असणार आहे. कमी पाण्यात हे पीक असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कोथिंबीर लागवड केली. आवक वाढल्याने भाव कमी झाले आहेत."

- महेंद्र वाघ, व्यापारी, मातोश्री व्हेजिटेबल कंपनी

Coriander available for sale on Old Agra Road in Malegaon.
Jalgaon Agriculture News : विषम वातावरणामुळे रब्बी पिकांना फटका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com