esakal | दिलासादायक बातमी! जिल्‍ह्‍यातील ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णांत मोठी घट
sakal

बोलून बातमी शोधा

corona patient

दिलासादायक बातमी! जिल्‍ह्‍यातील ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णांत मोठी घट

sakal_logo
By
अरूण मलानी

नाशिक : जिल्‍ह्‍यात गेल्‍या अनेक दिवसांनंतर ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण (active corona patient) संख्येत मोठी घट (decrease) झाली आहे. यामुळे जिल्‍ह्‍यात उपचार घेणाऱ्या रुग्‍णांची संख्या तीस हजारांच्‍या आत आली आहे. मंगळवारी (ता.11) दिवसभरात पाच हजार 385 रुग्‍ण कोरोनामुक्‍त झाले. तर दोन हजार 187 रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. .38 बाधितांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत तीन हजार 236 ने घट झाली. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्‍यात 28 हजार 859 बाधितांवर उपचार सुरु आहेत. (corona activated decreased nashik marathi news)


जिल्‍ह्‍यात मंगळावारी झालेल्‍या कोरोनामुक्‍त रुग्‍णांमध्ये सर्वाधिक तीन हजार 443 कोरोनमुक्‍त नाशिक ग्रामीणमधील आहेत. नाशिक महापालिका क्षेत्रातील एक हजार 810 रुग्‍ण तर मालेगावचे 34, जिल्‍हा बाहेरील 98 रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. नव्‍याने आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील एक हजार 546, नाशिक ग्रामीणमधील 620, मालेगावचे सहा तर जिल्‍हा बाहेरील पंधरा रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत जिल्‍ह्‍यात सात हजार 475 रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. यात नाशिक ग्रामीणमधील पाच हजार 941 रुग्‍णांना प्रतिक्षा होती. नाशिक शहरातील एक हजार 194, मालेगावच्‍या 340 रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार 989 रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील एक हजार 721 रुग्‍ण असून, जिल्‍हा रुग्‍णालयात सहा, डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात सतरा रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमध्ये दोनशे, मालेगावच्‍या 45 रुग्‍णांचा समावेश आहे.


हेही वाचा: ''मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत राज्यातील एकाही मंत्र्याला फिरकू देणार नाही"

निफाडच्‍या आठ जणांसह जिल्‍ह्‍यात 38 बाधितांचा मृत्‍यू
मंगळवारी जिल्‍ह्‍यात 38 बाधितांचा मृत्‍यू झाला असून, यात नाशिक शहरातील सात, नाशिक ग्रामीणमधील तीस तर मालेगाव महापालिका क्षेत्रातील एकाचा समावेश आहे. नाशिक ग्रामीणमध्ये सर्वाधिक आठ मृत निफाड तालुक्‍यातील आहेत. येवला तालुक्‍यात चार, बागलाण, इगतपुरी व मालेगाव तालुक्‍यात प्रत्‍येकी तीन बाधितांचा कोरोनाने बळी घेतला. पेठ, त्र्यंबकेश्‍वर, दिंडोरी, सिन्नर तालुक्‍यात प्रत्‍येकी दोन तर नाशिक तालुक्‍यातील एका बाधिकाचा कोरोनाने बळी घेतला आहे.हेही वाचा: परमबिरसिंग आरोप-प्रत्यारोप चौकशीसाठी मालेगावचे ॲड.शिशिर हिरेंची नियुक्ती

दहा लाख व्‍यक्‍तींचा अहवाल निगेटिव्‍ह
जिल्‍ह्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना चाचण्यांचे प्रमाणही वाढविले गेले होते. आत्तापर्यंत झालेल्‍या 13 लाख 68 हजार 739 चाचण्या करण्यात आल्‍या आहेत. यापैकी दहा लाख एक हजार 158 रुग्‍णांचे अहवाल निगेटिव्‍ह आले आहेत. तर तीन लाख 60 हजार 106 रुग्‍णांचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला आहे. शासकीय अहवालानुसार आत्तापर्यंतचा पॉझिटिव्‍हीटी दर 26.41 टक्‍के आहे.