लसीकरण केंद्रच बनले ‘कोरोना हॉटस्पॉट’! सुपर स्प्रेडर ठरण्याची भिती

नियोजनशून्य व्यवस्थापनामुळे कोरोना सुपर स्प्रेडर ठरण्याची भिती
ozar vaccination
ozar vaccinationesakal

ओझर (जि.नाशिक) : कोरोना व्हायरसपासून (coronavirus) बचाव करण्यासाठी शासनाने नागरिकांना लसीकरण (vaccination) करण्यास सांगितले आहे. परंतु ज्या ठिकाणी लस घेण्यात येते. तेच लसीकरण केंद्र आता कोरोनाचे हॉटस्पॉट (corona hotspot) बनत चालले आहे.

ozar vaccination
जिल्ह्यात 23 मे पर्यंत लॉकडाऊन! कडकडीत बंद

लसीकरण केंद्र कोरोनाचे हॉटस्पॉट

ओझर येथील आरोग्य केंद्रावर नागरीकांनी कोरोना नियम पायदळी तुडवत लसीकरणासाठी गर्दी केल्याने हे ठिकाण कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. दर सोमवार आणि गुरुवारी येथे यात्रेसारखी गर्दी होते. पोलिस प्रशासन, नगरपरिषद आणि आरोग्य केंद्राच्या नियोजनशून्य व्यवस्थापनामुळे कोरोना सुपर स्प्रेडर ठरण्याची भिती आहे.

कोरोना सुपर स्प्रेडर ठरण्याची भिती

लसीकरण केंद्राच्या आवारात राहणाऱ्या नागरिकांना या गर्दीचा मोठ्या प्रमाणात त्रास होऊन त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लस घेण्यासाठी रांगा लावताना होणारी भांडणे अपुऱ्या नियोजनाचा कळसच म्हणावी लागतील. ओझर नगरपरिषदेने याप्रश्‍नी फक्त हात वर न करता चोख व्यवस्थापन करण्याची मागणी नागरीकांकडून होत आहे.

ozar vaccination
नाशिकमध्ये कडक लॉकडाऊन; काय सुरू, काय बंद?

लोकप्रतिनिधी मतदानापुरतेच का?

लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी आवरण्यासाठी कुठल्याच यंत्रणेला यश आलेले नाही. निवडणुकीत मतदारांचे उंबरे झिजवणारे राजकीय पक्ष, नेते, लोकप्रतिनिधी कुठे गेले, असा प्रश्‍न संतप्त नागरीकांकडून विचारला जात आहे. ओझर शहरची व्याप्ती बघता दोनच लसीकरण केंद्रे पुरेसी नाहीत, असा सूर नागरीकांमधून ऐकू येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com