esakal | नांदगावला कोरोनारुग्ण आटोक्यात; लोकसहभागातून ऑक्सिजन, बेडची पूर्तता

बोलून बातमी शोधा

Nandgaoan corona

नांदगावला कोरोनारुग्ण आटोक्यात; लोकसहभागातून ऑक्सिजन, बेडची पूर्तता

sakal_logo
By
संजीव निकम

नांदगाव (जि. नाशिक) : कोरोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीत तालुक्यासाठी एकमेव कोविड सेंटर असलेल्या ग्रामीण रुग्णालयात तुटपुंज्या साधनांच्या बळावर कोरोना लढाई सुरूच आहे. कोरोनाचा समूह संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन बोरसे यांनी पालिका, महसूल व आरोग्य विभागाला अवगत करत प्रत्यक्ष चाचण्यांना प्राधान्य दिले. नांदगाव शहरातील उद्रेक आता नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे.

येवला, मालेगाव, वैजापूर येथील रुग्णही मोठ्या संख्येने नांदगावच्या कोविड सेंटरकडे धाव घेत आहेत. नांदगावला दाखल होणाऱ्या रुग्णाला प्राथमिक टप्प्यात वैद्यकीय उपचारासोबत दिलासादायक समुपदेशन देण्यात आले. या सर्व काळात लोकसहभागही महत्त्वाचा ठरला. अनेक दानशूरांनी ग्रामीण रुग्णालयाला ऑक्सिजन सिलिंडर ते विविध प्रकारची देऊ केलेली मदत महत्त्वाची ठरली. ग्रामीण रुग्णालयाचे गेल्या वर्षापासून कोविड रुग्णालयात रूपांतर करण्यात आले. प्रत्यक्ष तीस खाटांचे ऑक्सिजन बेडच्या सुविधा असलेल्या या रुग्णालयात प्रत्यक्षात क्षमतेपेक्षा जास्तीचे रुग्ण दाखल करून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

हेही वाचा: तर मुख्यमंत्री ठाकरेंनी देखील राजीनामा द्यावा! भाजपचा शिवसेनेवर पलटवार

नांदगाव दृष्टिक्षेपात ः

- रोज दोन वेळेला १०० रुग्णांची ओपीडी (फिव्हर क्सिनिक)

- ३० ऑक्सिजन बेडची क्षमता, मात्र ३८ रुग्णांवर उपचार सुरू

- दररोज १०० हून अधिक रुग्णांची स्वॅब टेस्टिंग सुरू

- लोकसहभागातून ग्रामीण रुग्णालयाला सात जम्बो ऑक्सिजन व पंचवीस लहान सिलिंडर

- आमदार सुहास कांदे यांच्याकडून अद्ययावत रुग्णवाहिका

- ऑक्सिजन रिफिलिंगचे सूत्रबद्ध नियोजन

- मनमाड, नांदगावमध्ये बेड वाढविण्याची गरज

- नस्तनपूरला गुप्ता हॉस्पिटलच्या तीस, विवेक हॉस्पिटलला पाच बेडची मंजुरी

हेही वाचा: कोविड सेंटरच्या पायरीवर सोडला रुग्णाने प्राण! चांदवडच्या व्हायरल VIDEO मागचं सत्य..

कोरोना हा आजार असला तरी सध्या नैसर्गिक आपत्तीसारखे त्याबाबतचे आव्हान लक्षात घेऊन आम्ही काम करीत आहोत. स्थानिक पातळीवरील लोकसहभाग मिळत गेल्याने आलेल्या संकटावर मत करता आली.

- डॉ. रोहन बोरसे, वैद्यकीय अधीक्षक