Corona Update : शहरात तब्बल 3 महिन्यानंतर आढळला कोरोनाचा रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona patient

Corona Update : शहरात तब्बल 3 महिन्यानंतर आढळला कोरोनाचा रुग्ण

मालेगाव (जि. नाशिक) : राज्यात महाराष्ट्र दिनापासून (Maharashtra Din) कोरोना निर्बंध पुर्णपणे उठविण्यात आले. पहिल्या लाटेत शहरात कोरोनाचा (Corona) उद्रेक झाला होता. यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या लाटेत शहरवासीयांनी कोरोनाचा यशस्वीपणे मुकाबला केला. मालेगाव पॅटर्न देशात प्रसिध्द झाला. शहरवासियांची प्रतिकार क्षमता लक्षात घेता मालेगाव पॅटर्न जाणून घेण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे (University of Health Sciences) रक्त नमुने (Blood Sample Test) तपासणी केली जात आहे. काेरोना संसर्गाच्या चौथ्या लाटेची (Fourth Wave) शक्यता वर्तवली जात असताना शहरात तब्बल तीन महिन्यानंतर कोरोनाचा एक रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. (Corona patient found in city after 3 months Nashik Corona Update News)

हेही वाचा: बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईची मागणी

दरम्यान हा रुग्ण खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी असून कॅम्प पोलिस ठाण्यात अटकेत होता. सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी दरम्यान त्याचा स्वॅब घेतला असता चाचणी कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) आली. द्याने गौतमनगर भागातील हा संशयित आरोपी असून १९ वर्षीय तरुणाच्या खुनात तो अटकेत आहे. या संशयिताची जिल्हा कारागृहात रवानगी झाल्याची माहिती कॅम्प पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे शहरवासियांनी चिंता करण्याची गरज नाही. मात्र योग्य ती खबरदारी घ्यावी. निष्काळजीपणे वागू नये असे महापालिकेच्या आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी सांगितले. तीन महिन्यापुर्वी दोन रुग्ण आढळले होते. त्यानंतर हा रुग्ण आढळला. गेली अनेक महिने शहरातील रुग्णसंख्या शून्य होती असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीस शिक्षा

Web Title: Corona Patient Found In City After 3 Months Nashik Corona Update News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top