नाशिककरांनो काळजी घ्या! शहरात पुन्‍हा कोरोना पाहुणा पसरतोय पाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona fights.jpg

बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात ३२५ कोरोनाबाधितांची भर पडली. यापैकी २०३ बाधित नाशिक शहरातील आहेत. १०७ नाशिक ग्रामीणमधील, तर आठ मालेगाव महापालिका हद्द, सात जिल्‍हाबाह्य बाधितांचा समावेश आहे.

नाशिककरांनो काळजी घ्या! शहरात पुन्‍हा कोरोना पाहुणा पसरतोय पाय

नाशिक : तीन दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील दिवसभरातील नीचांकी संख्या गाठलेली असताना, बुधवारी (ता.११) दिवसभरात नाशिक शहरात २०३ बाधितांसह जिल्ह्यात एकूण ३२५ बाधित आढळून आले. दिवाळीच्‍या उत्‍सावामुळे बाजारात गर्दी वाढत असून, हलगर्जीमुळे पुन्‍हा कोरोनाचा शिरकाव होण्याची शक्यता आहे. कोरोनाचा धोका टळलेला नाही, याची जाणीव नागरिकांमध्ये निर्माण होण्याची गरज आहे. 

दिवसभरात ३२५ कोरोनाबाधितांची भर

प्रशासकीय यंत्रणेने दिवाळी खरेदीसाठी ‘नो मास्‍क-नो एंट्री’ नियम जाहीर केले असले तरी, गर्दीत नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र आहे. बाजारात तुडुंब गर्दीत सोशल डिस्‍टन्सिंगचाही फज्‍जा उडाल्याने बाधितांच्‍या संख्येत पुन्‍हा वाढ होऊ लागली आहे. बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात ३२५ कोरोनाबाधितांची भर पडली. यापैकी २०३ बाधित नाशिक शहरातील आहेत. १०७ नाशिक ग्रामीणमधील, तर आठ मालेगाव महापालिका हद्द, सात जिल्‍हाबाह्य बाधितांचा समावेश आहे. दिवसभरात ३२२ रुग्‍ण कोरोनामुक्‍त झाले असून, यापैकी २९८ नाशिक शहरातील, १८ नाशिक ग्रामीण, तीन मालेगाव, तर तीन जिल्‍हाबाह्य रुग्‍णांचा समावेश आहे. 

सद्यःस्‍थितीत २ हजार ८११ बाधितांवर उपचार

चार रुग्‍णांचा मृत्‍यू झाल्‍याची नोंद असून, यापैकी एक रुग्‍ण नाशिक शहरातील आहे, तर नाशिक ग्रामीणमधील तीन रुग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. यातून जिल्ह्यात आढळलेल्‍या कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ९६ हजार २६९ झाला असून, यापैकी ९१ हजार ७४३ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. एक हजार ७१५ रुग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. तर सद्यःस्‍थितीत दोन हजार ८११ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

हेही वाचा > भाजप नेत्याच्या वाढदिवसाचा भररस्त्यात जल्लोष! पोलिस प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

रुग्‍णालयात दाखल रुग्ण वाढले 

कोरोनासदृश लक्षणांमुळे दिवसभरात रुग्‍णालयांत व गृहविलगीकरणात दाखल रुग्‍णांच्‍या संख्येतही पुन्‍हा वाढ झाल्‍याचे चित्र आहे. बुधवारी दिवसभरात नाशिक महापालिका हद्द आणि गृहविलगीकरणात ८९९ रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीण रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ३६, मालेगाव महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ११, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात तीन, तर जिल्‍हा रुग्‍णालयात पाच रुग्‍ण दाखल झाले.  

हेही वाचा > मामा होता म्हणून भाची सहीसलामत! अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले भाचीला

loading image
go to top