#COVID19 : कोरोना संशयित दहा जण विलगीकरण कक्षात

corona commodities.jpg
corona commodities.jpg

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील कोरोना विषाणू विलगीकरण कक्षामध्ये गेल्या 24 तासांत परदेशातून आलेले नऊ कोरोना संशयित दाखल झाले आहेत, तर महापालिकेच्या जाकिर हुसेन रुग्णालयात एकाला दाखल करण्यात आले. या दहाही रुग्णांच्या स्वॅबचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे रात्री पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, एकीकडे कोरोना विषाणूची दहशत असताना, स्वाइन फ्लूनेही डोके वर काढले असून, विशेष कक्षातील दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह, तर एकाचा रिपोर्ट प्रलंबित आहे. 

जिल्हा रुग्णालय : एका कुटुंबातील चिमुकलीसह तिघे 
जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना विषाणू आजार विलगीकरण कक्षात बुधवारी (ता. 18) रात्री दुबईहून आलेल्या दोघांना दाखल करण्यात आले, तर गुरुवारी सायंकाळपर्यंत आणखी सात संशयित रुग्ण दाखल झाले. या कक्षात सध्या नऊ रुग्ण दाखल आहेत. यात दुबईतून आलेले दोन, फिनलॅंड येथे पर्यटनानंतर आलेले एकाच कुटुंबातील तिघे, मलेशियातून दोन व अमेरिका व जर्मनीतून प्रत्येकी एक असे नऊ जण दाखल आहेत. महापालिकेच्या जाकिर हुसेन रुग्णालयात दुबईहून आलेला एक संशयित रुग्ण दाखल आहे. या साऱ्यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीनंतर शुक्रवारी (ता. 20) सायंकाळपर्यंत त्यांचे रिपोर्ट प्राप्त होण्याची शक्‍यता आहे. 

स्वाइन फ्लूचे दोन रुग्ण 
दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात दाखल असलेल्या एकाचा रिपोर्ट यापूर्वीच पॉझिटिव्ह आला होता. बुधवारी (ता. 18) आणखी दोघे संशयित दाखल झाले होते. त्यातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असून, दुसऱ्याचा रिपोर्ट अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे सध्या या कक्षामध्ये दोघे स्वाइन फ्लूबाधित रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

कोरोना संशयितांची आकडेवारी 
* कोरोनाग्रस्त देशांतून आलेले एकूण नागरिक : 189 
* 14 दिवसांचे सर्वेक्षण झालेले : 31 
* दैनंदिन सर्वेक्षणातील नागरिक : 158 
* निगेटिव्ह रिपोर्ट प्राप्त झालेले : 31 
* प्रलंबित रिपोर्ट : 10 
* सध्या विलगीकरण कक्षात दाखल : 10 

हेही वाचा > धक्कादायक! आंघोळीसाठी 'तीघी' तलावात उतरल्या...अन् थोड्या वेळाने मृतदेहच पडले बाहेर..

विदेशातून आलेले नागरिक : 
* यूएई : 74 
* सौदी : 9 
* अमेरिका : 9 
* इटली : 12 
* जर्मनी : 7 
* यूके (इंग्लंड) : 9 
* इराण : 8 
* चीन : 5 
*अन्य देश : 56 
* एकूण : 189  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com