esakal | नाशिक : पंधरा दिवसांनंतर जिल्ह्यात शंभराहून अधिक पॉझिटिव्‍ह | Corona Update
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

नाशिक : पंधरा दिवसांनंतर जिल्ह्यात शंभराहून अधिक पॉझिटिव्‍ह

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : जिल्‍ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत असताना, १५ दिवसांनंतर दैनंदिन आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या शंभराहून अधिक राहिली. गुरुवारी (ता.१४) जिल्‍ह्यात १२९ रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. ७१ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वी मात केली, तर एका बाधिताच्‍या मृत्‍यूची नोंद आहे. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत ५७ ने वाढ झाली आहे. यातून जिल्‍ह्यात उपचार घेणाऱ्या ॲक्‍टिव्‍ह रुग्णांची संख्या ७२३ वर पोचली आहे.

यापूर्वी गेल्‍या २९ सप्‍टेंबरच्‍या अहवालात दिवसभरात १५५ कोरोनाबाधित आढळल्‍याची नोंद होती. १ ऑक्‍टोबरला ९९ कोरोनाबाधित आढळले होते. नंतर बऱ्याच वेळा दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या ९० पर्यंत पोचली. मात्र, शंभरचा आकडा ओलांडला नव्‍हता. ऑक्‍टोबरमध्ये गुरुवारी प्रथमच दैनंदिन कोरोनाबधितांच्‍या संख्येने शंभरचा आकडा ओलांडला. यात नाशिक ग्रामीण क्षेत्रातील संख्या अधिक असून, या क्षेत्रात ८४ कोरोनाबाधित आढळले. नाशिक शहरात ४०, तर जिल्‍हाबाहेरील पाच रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. ७१ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वी मात केली. एका बाधिताच्‍या मृत्‍यूची नोंद असून, हा मृत नाशिक ग्रामीण क्षेत्रातील आहे.

हेही वाचा: दिंडोरी तालुक्यात पावसाचा १५ हजार हेक्टरवरील टोमॅटोला फटका

प्रलंबित अहवालांची संख्या लक्षणीय राहत असून, गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार ४४९ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यात नाशिक ग्रामीणमधील ९४६, नाशिक शहरातील ३२८, मालेगावच्‍या १७५ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ६३८ रुग्‍ण दाखल झाले. यापैकी नाशिक महापालिका क्षेत्रातील ६२८ रुग्‍णांचा समावेश होता. जिल्‍हा रुग्‍णालयात एक रुग्‍ण दाखल झाला. नाशिक ग्रामीणमधील नऊ रुग्‍णांचा संशयितांमध्ये समावेश होता.

हेही वाचा: सणासुदीच्या गोडव्याला महागाईची झळ; दुध दरवाढीमुळे मिठाई महागली

loading image
go to top