esakal | Nashik News | दिंडोरी तालुक्यात पावसाचा १५ हजार हेक्टरवरील टोमॅटोला फटका
sakal

बोलून बातमी शोधा

return rains hit 15000 hectares of tomato crop in Dindori taluka

दिंडोरी तालुक्यात पावसाचा १५ हजार हेक्टरवरील टोमॅटोला फटका

sakal_logo
By
रामदास कदम


दिंडोरी (जि. नाशिक) : तालुक्यातील १ लाख ३२ हजार ३२५ हेक्टर क्षेत्रापैकी १२ हजार ३२५ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली होती. मध्यतरीत टोमॅटो पिकाचे भाव एकदम घसरल्याने मोठ्या प्रमाणात टोमॅटो रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांनी आंदोलन केले. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता. आता मार्केट हळूहळू वाढत असताना परतीच्या प्रवासाने तालुक्यात पुन्हा एकदा टोमॅटो उत्पादकांना फटका बसला आहे. आजमितीस सुमारे पंधरा हजार हेक्टरवरील टोमॅटोचे नुकसान झाले आहे.

तालुक्यात यंदा साडेतीन महिने तसा समाधानकारक पाऊस झालाच नाही, त्यामुळे धरणेही पुरेशी भरलेली नाहीत. असे असताना शेवटच्या टप्प्यात धो-धो पावसाने कहर केला. परतीच्या प्रवासाने तालुक्यात प्रचंड धुमाकूळ घातला, त्यामुळे टोमॅटोच्या वेलीला पानेच न राहिल्याने वेली पूर्ण खराब झाल्या. अनेक ठिकाणी कच्ची फळेही गळाली. परिपक्व होण्याच्या स्थितीत असलेली फळेही झाडावरच सडली आहेत. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

शेवटच्या टप्प्यात सततच पाऊस, सकाळी पडणारे धुके, त्यातून पानावर दव असल्याने उन्हाची किरणे पानावर पडल्याने करपा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ज्या शेतकऱ्यांचे टोमॅटो पिक चांगले आहे त्यांना फळकुज, फुलगळ अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले आहे. सध्या सतत वातावरणात होणारा बदल, त्यामुळे दररोज बुरशीनाशक औषधांची फवारणी करावी लागते आहे. औषधांचा खर्च सध्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे. फवारणी करुनही बुरशीचा प्रादुर्भाव कमी होत नाही.

हेही वाचा: मालेगावात कॉंग्रेसला धक्का, माजी आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर

तालुक्यात टोमॅटो उत्पादन घेणारी गावे मोहाडी, जानोरी, जऊळके दिंडोरी, खेडगाव, तिसगाव, राजापूर, मातेरेवाडी, पालखेड, कोऱ्हाटे, अक्राळे, खतवड, ढकांबे, वरवंडी, कसबे वणी, परमोरी, ओझरखेड, अवनखेड, चिंचखेड, करंजवण, खेडले, लखमापूर, जांबूटके, मडकीजांब आदी परिसरात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यावर्षी टोमॅटोचे चार पैसे येतील अशी अपेक्षा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होती, पण तशी परिस्थिती निर्माण झाली नाही. पावसाळ्यात टोमॅटो पिकातून दोन पैसे मिळून त्यातून आगामी द्राक्ष पिकासाठी भांडवल उभे करता येईल ही अपेक्षा या परिसरातील शेतकरयांची होती. तसे चित्र यावर्षी राहिले नाही. फवारणीच्या औषधांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, त्यामुळे आहे त्या पिकांना औषधे फवारणी खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

हेही वाचा: सॅमसंग Galaxy A52s 5G फोनचा नवीन व्हेरियंट लॉंच! पाहा डिटेल्स

loading image
go to top