esakal | नाशिक विभागात ९६ टक्क्यांवर रुग्णांची कोरोनावर मात; मृत्युदर १.४१ टक्क्यांवर
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

नाशिक विभागात ९६ टक्क्यांवर रुग्णांची कोरोनावर मात

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : नाशिक विभागात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. विभागात आठ लाख ७८ हजार ७३२ रुग्णांपैकी आतापर्यंत आठ लाख ४८ हजार २९९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यःस्थितीत १७ हजार ९७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विभागात १२ हजार ४२५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५३ टक्के, तर मृत्युदर १.४१ टक्के इतका आहे. आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी ही माहिती दिली. (corona updats 96 percent of corona patients recovered in nashik division)

धुळे

धुळे जिल्ह्यात ४२ हजार २६० कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यापैकी ४१ हजार शंभर रुग्ण पूर्णपणे बरे झाले. तर ४९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण या जिल्ह्यात ९७.२५ टक्के आहे. आजपर्यंत ६६६ रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्याचा मृत्युदर १.५७ टक्के आहे.

हेही वाचा: नाशिकमध्ये नवी नियमावली; जाणून घ्या नेमकं काय सुरु, काय बंद?

जळगाव

जळगाव जिल्ह्यात आढळलेल्या एक लाख ४० हजार ७३५ रुग्णांपैकी एक लाख ३४ हजार ७६८ रुग्ण पूर्णपणे बरे झाले. तसेच तीन हजार ४१५ रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७६ टक्के आहे. जिल्ह्यात दोन हजार ५५० रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्याचा मृत्युदर १.८१ टक्के आहे.

हेही वाचा: सलग तिसऱ्या दिवशीही नाशिकमध्ये पावसाची दमदार हजेरी

नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यात ४० हजार ९१ रुग्ण आढळले. तर ३८ हजार ८६० रुग्ण पूर्णपणे बरे झाले. ३४८ रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९२ टक्के आहे. आजपर्यंत ८४९ रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्याचा मृत्युदर २.११ टक्के आहे.

(corona updats 96 percent of corona patients recovered in nashik division)

loading image
go to top