esakal | सलग तिसऱ्या दिवशीही नाशिकमध्ये पावसाची दमदार हजेरी
sakal

बोलून बातमी शोधा

 rain in Nashik

सलग तिसऱ्या दिवशीही नाशिकमध्ये पावसाची दमदार हजेरी

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : शहर-जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशीही पावसाने दमदार हजेरी लावली. मृग नक्षत्र सुरू होण्याआधीच दमदार हजेरी लावलेल्या पावसाने नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. शहर- जिल्ह्यात दोन दिवसांपासून आभाळ भरून आले आहे. आकाशातील ढगाळ वातावरणाने मृगात दमदार हजेरीचे संकेत आहेत. दरम्यान, दिवसभरात २.६ मिलिमीटर पावसाची शहरात नोंद झाली. (Heavy rains in Nashik for the third day in a row)

वीकेंड लॉकडाउन असल्याने नागरिकांची गैरसोय झाली नाही. शहरासह रविवारी सकाळी पूर्व पट्ट्यात जोरदार पाऊस झाला. नाशिक रोडसह तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध खेडेगावांत जोरदार पाऊस झाला. दुपारनंतर काही काळ विश्रांतीनंतर पुन्हा जोरदार पाऊस झाला. काही वेळातच शहरातील रस्त्यावर पाणी साचले. पावसामुळे वातावरणातील उकाडा मात्र कमी झाला आहे. तसेच सलग तीन दिवसांपासूनच्या पावसाने धरणातील पाणीसाठ्याला मदत होत आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा अजूनही तीन टक्के पाणी कमी आहे. यंदा आतापर्यंत धरणात २८ टक्के पाणीसाठा आहे. मागील दोन वर्षापूर्वीच्या समाधानकारक पावसाने यंदा मे महिन्यातही पाण्याची टंचाई नव्हती. मात्र यंदा धरण भरण्यासाठी चांगल्या पावसाची गरज आहे. सध्याचा पाणीसाठा बघता, येत्या महिन्याभरापर्यंत नाशिककर नागरिकांना पाण्याची चिंता नाही. जुलैत मात्र चांगल्या पावसाची गरज लागणार आहे.

हेही वाचा: पिंपळगाव शहरातील चाळींमध्ये ५० हजार टन कांद्याची साठवणूक

उड्डाणपुलावर पाणी

शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील पुलावर जागोजागी पाणी साचल्याने वाहनचालकांची गैरसोय झाली. वर्षभरात पुलावर पडणाऱ्या पावसाचे पाणी काढून देण्यासाठी पुलाला असलेले होल बहुतांश भागात बुजलेले असल्याने पावसाचे पाणी पुलावरून खाली पडण्यास उशीर होऊन पाणी साचून गैरसोय झाली.

(Heavy rains in Nashik for the third day in a row)

हेही वाचा: नाशिकमध्ये नवी नियमावली; जाणून घ्या नेमकं काय सुरु, काय बंद?

loading image
go to top