esakal | धुळगावचे जवान सचिन गायकवाड अनंतात विलीन! आठ दिवसापूर्वीच झाले होते रुजू
sakal

बोलून बातमी शोधा

dhulgaon jawan sachin gaikwad dies of heart attack

धुळगावचे सुपुत्र जवान सचिन गायकवाड अनंतात विलीन!

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

धुळगाव (जि. नाशिक) : पंधरा दिवसांची सुट्टी उपभोगली रक्षाबंधन, पोळा व गावातील गणपती व शंकराच्या मंदिराचे जिर्णोद्धार आटोपून कर्तव्यावर गेला असतांना धुळगाव तालुका येवला येथील भूमिपुत्र सचिन गायकवाड यांचे काल मेडिकल हाॅस्पीटल येथे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.

पुणे येथील युनिट-120 इंजिनीयर रेजिमेंट, सी एम ई मध्ये कर्तव्य बजावत असतांना सचिन जागेवरच कोसळून सचिन ला आठ दिवसापूर्वीच अँडमिट केले होते. दि 25 मे रोजी सचिन कर्तव्यावर रूजू झाला होता दिवसापूर्वीच 26 मे रोजी तो जागेवरच पडल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते व कालच त्याला हृदय विकासाचा झटका आला व मृत झाला. आज सकाळी 9 वाजता मुख्यालयात त्याच्यावर शासकीय औपचारिकता आटोपल्यावर त्यांचे पार्थिव पुणे येथून रवाना झाले व आज दुपारी दोन वाजता त्याचे मूळ गावी पोहोचले.

त्यांच्यावर ३ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैनिक रेजिमेंट चे राजेंदर सिंग, तहसिलदार प्रमोद  हिले, पोलीस निरीक्षक अनिल भवारी जिप सदस्य संजय बनकर शिवसेना तालुकाप्रमुख रतन बोरणारे प्रा माधव गायकवाड उल्हास गायकवाड एकनाथ गायकवाड गोदावरी बैंकेचे मुख़्य कार्यकारी अधिकारी नारायण थेटे, दिलीप डेर्ले, पंकज पवार, निफाड तालुका माजी सैनिक महासंघ अध्यक्ष खरात शहीद संघाचे नवनाथ पगार येवला तालुका सैनिक अध्यक्ष धनवटे उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील आजी माजी सैनिक गणवेशात उपस्थित होते. गावातील महिलांनी संपूर्ण गावात रांगोळी काढली होती.

हेही वाचा: नाशिक : अभिनेता आस्ताद काळेंनी गोदावरीमध्ये मारली डुबकी

ग्रामपंचायतीकडून मोफत मास्क व सॅनिटाजेशन

तालुक्यात कोरोणाचा उद्रेक असल्याने यावेळी धुळगाव येथील ग्रामपंचायत सरपंच योगेश गायकवाड व राजेंद्र गायकवाड यांनी गावात मोफत मास्क व सॅनिटाजेशन केले. तसेच अंत्यसंस्काराचा रस्त्यावर पडलेले खड्डे मुरूम टाकून बुजविले, स्मशान भूमीतील स्वच्छता केली, डीजे लावून सचिन गायकवाड अमर रहे अशा घोषणा दिल्या, यावेळेस सर्व गाव अंत्यसंस्कारास उपस्थित होते.

दोन मुली अराध्या संस्कृती

सचिन यांना अराध्या (वय दोन वर्ष) व संस्कृती (वय चार वर्ष) अशा दोन लहान मुली आहेत अंत्यसंस्कारावेळी आई का रडते म्हणून त्या विचारत होत्या. वडील भिमराज गायकवाड व आई मिराबाई व भाऊ विजय असा परिवार होता. यावेळी लहान भाऊ विजय ने अग्नीडाग दिला.

हेही वाचा: बापाच्या डोळ्यादेखत लेकाच्या मृत्यूतांडव; थरारक 13 तास

loading image
go to top