esakal | बारा तासांत ३२ हजाराने कोसळला कोथिंबिरीचा दर; उत्पादक चिंतेत | Nashik
sakal

बोलून बातमी शोधा

कोथिंबिरीचा दर

बारा तासांत ३२ हजाराने कोसळला कोथिंबिरीचा दर; उत्पादक चिंतेत

sakal_logo
By
गोविंद अहिरे


नरकोळ (जि. नाशिक) :
कोथिंबीर दराबाबत चढ-उतार कायम असून, एका रात्रीतून दरात काय बदल होईल हे सांगणे आता कोथिंबिरीच्या बाबतीतही कठीण झाले आहे. १२ तासआधी ५० हजारांना जाणारी कोंथिबीर दुसऱ्या दिवशी सकाळी १७ ते १८ हजाराने खरेदीचा निर्णय व्यापारी ठरवितात, एका रात्रीत भावात असा कोणता फरक पडला असेल, अशी चर्चा कोंथिबीर उत्पादकांमध्ये सुरू आहे.


केरसाणे (ता. बागलाण) येथील शेतकरी रवींद्र अहिरे यांनी आपल्या शेतात भाव मिळेल, या आशेने २५ गुंठे कोथिंबिरीची लागवड केली. महागडी बियाणे, फवारणी, निंदणी, पाणी भरणे आदी बाबींचा विचार केल्यास हे पीक न परवडणारे. अहिरे यांनी हे पीक मेहनत करून घेतले. आलेले उत्पादन विक्रीसंदर्भात संबंधित व्यापाऱ्यांशी संपर्क केला. व्यापाऱ्याने ४७ हजारांना कोथिंबिर मागितली. परंतु अहिरे यांनी पन्नास हजारांची अपेक्षा व्यक्त केली. दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्याने थेट १७ ते १८ हजारांना कोथिंबीर मागितली. १२ तासांत असे काय घडले, असा प्रश्‍न व्यापाऱ्यास विचारात कपाळाला हात लावला.

हेही वाचा: सावधान… मंदिर आणि शाळा उघडत असल्याने घ्या काळजी


२५ गुंठ्यासाठी आलेला खर्च
शेत तयार करणे : एक हजार रुपये
४० पुडे (२६० रु प्रतिकिलो) : १० हजार ४००
निंदणी : तीन हजार रुपये
फवारणी : दोन हजार रुपये
पाणी भरणे : एक हजार रुपये
युरिया गोण : २७० रुपये

कोथिंबिरीला भाव मिळेल या आशेने २५ गुंठ्यावर कोथिंबिर घेतली. परंतु ऐनवेळी भाव घसरल्याने केलेला खर्च निघणार नाही, अशी अवस्था असल्याने आता कोणते पीक घ्यावे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोथिंबिरीने कर्जबाजारी केले.
- रवींद्र अहिरे, केरसाणे (ता. बागलाण)

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यात पावसामुळे एक लाख ३९ हजार हेक्टरची धूळधाण

loading image
go to top