
नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेतर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. आता आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत ऍप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर ऍप उपलब्ध करून देण्यात आले आहे. महापालिकेच्या कोरोनाविषयक उपाययोजनांच्या माहितीसोबत भीती व अफवांवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.
स्मार्टसिटी-कोडवेलचा उपक्रम, परदेशातून आलेल्यांची माहिती भरता येणार
महापालिका, स्मार्टसिटी कंपनी व कोडवेल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडतर्फे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. अँड्राइड मोबाईलद्वारे तत्काळ माहितीची देवाणघेवाण होईल. सध्या आपत्कालीन अथवा माहिती कक्षाकडे दूरध्वनीद्वारे माहिती दिली जाते. उपलब्ध माहितीनुसार वैद्यकीय अधिकारी संबंधित नागरिकांच्या घरी जाऊन वैद्यकीय तपासणी करतात. दैनंदिन अहवाल सरकारला पाठविला जातो. ही प्रक्रिया सोपी व्हावी म्हणून मोबाईल ऍप्लिकेशन तयार करण्यात आले. ऍपमध्ये परदेशातून आलेल्या नागरिकांची, कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींबाबत माहिती भरता येणार आहे. महापालिकेच्या http://www.nmc.gov.in या संकेतस्थळावर ऍपची लिंक उपलब्ध आहे. शिवाय व्हॉट्सऍपद्वारे इतरांपर्यंत लिंक पोचविता येणार आहे.
घरबसल्या मिळणार वस्तू
ऍपच्या माध्यमातून नागरिकांना रुग्णालय, वैद्यकीय अधिकारी, भाजीपाला, मांस, किराणा माल, निवारा केंद्र, औषध दुकाने याबाबतची माहिती संपर्क क्रमांकासह पाहता येणार आहे. ऍपवरील माहितीनुसार संबंधित आस्थापनांना मोबाईलद्वारे वस्तूंची मागणी नोंदवून घरपोच सेवा मिळविता येईल. त्यातून गर्दी टाळण्याबरोबरच सामाजिक अंतर राखण्याचा उद्देश साध्य होणार आहे.
मोबाईल ऍपची ठळक वैशिष्ट्ये
-नाशिकमधील सरकारी रुग्णालयांची यादी.
-डॉक्टरांचा संपर्क क्रमांक.
-वातावरणातील बदलासह डॉक्टरांचा सल्ला.
-कोरोना संदर्भातील सरकारी माहिती.
-कोरोनासंदर्भातील अफवा व भीती दूर होईल.
-अन्नदाते अथवा मदतनिसांचा मोबाईल क्रमांक नोंदविता येणार.
-मेडिकल, भाजीपाला, फळ विक्रेत्यांची नावे व पत्ता.
-शहरातील निवारा केंद्रांची माहिती.
-कोरोना संशयितांची माहिती भरता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.