मनपाच्या फिरत्या दवाखान्याची समाजकंटकांकडून तोडफोड; वाहनांची सुरक्षा रामभरोसे

todfod.jpg
todfod.jpg

नाशिक : मिशन नाशिक झिरो उपक्रमातील फिरत्या दवाखाना वाहनांची समाजकंटकांनी शुक्रवारी (ता.८) मध्यरात्री तोडफोड केली. भद्रकाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. महापालिकेच्या पार्किंगमधील 
वाहनाच्या तोडफोडीने वाहनांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. 

वाहनांची सुरक्षा रामभरोसे
महापालिकेने शहरातील कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मिशन नाशिक झिरो उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी फिरते दवाखान्याचे पथक तयार केले आहे. ही पथके फिरत्या दवाखान्यासोबत विविध भागात जाऊन 
नागरीकांची तपासणी करतात. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण शोधतानाच नागरिकांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत होत आहे. सायंकाळी सर्व फिरत्या दवाखान्याची वाहने महापालिकेच्या बि.डी. भालेकर मैदानात पार्क करण्यात येतात. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सायंकाळी सर्व वाहने पार्क करण्यात आली. मात्र अज्ञात समाजकंटकांनी वाहन (क्रमांक एम.एच.१५, जी व्ही ३४३०) चालकाच्या बाजूच्या प्रवेशद्वाराची काच फोडली.

चोरीच्या उद्देशाने वाहनांची काच फोडल्याची चर्चा

वाहनात काही सामान नसल्याने काहीही चोरी गेले नाही. शनिवारी (ता.८) सकाळी नउच्या सुमारास चालकाच्या हा प्रकार लक्षात आला. भद्रकाली पोलिसांना माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. पोलीसांनी कालिदास कला मंदिर आणि परिसरातील खाजगी रुग्णालयाच्या सिसीटिव्ह कॅमेरा फुटेजची तपासणी केली. मात्र पार्किग लांब असल्याने कॅमेऱ्यात प्रकार आला नाही. या प्रकारानंतर खबरदारी घेत शनिवारी (ता.८) सर्व वाहने कालिदास कला मंदिर आणि महात्मा फुले कलादालनाच्या मोकळ्या जागेत पार्क केले. महापालिकेची येथे सुसज्ज पार्किग आहे. पण पार्किंगमध्ये अनेक दिवसांपासून कर्मचारी किंवा सुरक्षारक्षक नसल्यामुळे टवाळखोरांनी चोरीच्या उद्देशाने वाहनांची काच फोडल्याची चर्चा परिसरात होती. 

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com