esakal | नगरसेविका जेव्हा ८ फुटी लांबीची धामण हाती घेतात...एक थरारक प्रसंग!
sakal

बोलून बातमी शोधा

corporator caught sneak

नगरसेविका जाधव जेव्हा धामण हाती घेतात...एक थरारक प्रसंग

sakal_logo
By
राजेंद्र बच्छाव

इंदिरानगर (नाशिक) : चेतनानगर येथे नागरिकांना दोन आठ ते दहा फूट लांबीच्या धामण जातीच्या सापांचे झालेले दर्शन चर्चेचा विषय तर ठरला, मात्र त्यापेक्षाही जास्त नगरसेविका संगीता जाधव यांनी धामणला लीलया हाताळताना बघून नागरिकदेखील आश्चर्यचकित झाले. काय घडले नेमके? (corporator-sangita-Jadhav-caught-sneak-marathi-news-jpd93)

नगरसेविका जाधव जेव्हा धामण हाती घेतात..

सोमवारी (ता. १२) सायंकाळी पाचच्या सुमारास नगरसेविका जाधव यांच्या बंगल्यात आणि समोर असलेल्या सारथी सोसायटीच्या प्रांगणात आसपास खेळणाऱ्या मुलांना दोन धामण दिसल्या. या धामण बघून मुलांनी आणि महिलांनी आरडाओरडा सुरू केला. झाडांच्या फांद्यांमध्ये असलेल्या धामणच्या जवळ कुणी जाण्याचा प्रश्नच नव्हता. कुणी दूरवरून, तर कुणी इमारतीच्या वरच्या मजल्याच्या खिडकीतून मोबाईलद्वारे चित्रीकरण करत होते. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी आणि नगरसेविका जाधव यांनी सर्पमित्र श्‍यामराव यांना ही माहिती दिली. ते आले आणि त्यांनी या दोघा सापांना पकडले. त्यानंतर सौ. जाधव यांनी त्यांपैकी एक धामण आपल्या हातात घेत निष्णात सर्पमित्र ज्याप्रमाणे सापाला पकडून त्याला सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यासाठी जी कृती करतात, ती सर्व कृती करून सर्वांना चकित केले. या प्रजातीबाबत श्‍यामराव यांनी नागरिकांना इत्थंभूत माहिती दिली. त्यानंतर या सापांना त्यांनी जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी आपल्यासोबत नेले.

हेही वाचा: शिष्यवृत्तीने बदलले आयुष्य! लग्नगाठीही जुळल्या

हेही वाचा: शाळा-महाविद्यालयांबाबतचा निर्णय पालकमंत्र्यांच्‍या कोर्टात

loading image