Nashik Crime News : कापूस व्यापाऱ्याला 12 लाखाला लुटले

Crime News
Crime Newsesakal

मालेगाव (जि. नाशिक) : झोडगे - भिलकोट रस्त्यावर कापूस व्यापाऱ्याकडील १२ लाख रुपये चौघा संशयित यांनी लूटून नेले. १० फेब्रुवारीला हा प्रकार घडला. (cotton merchant was robbed of 12 lakhs Nashik Crime News)

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

Crime News
Jalgaon Crime News : भुसावळला पिस्तूल लावून मागितली खंडणी

कापूस व्यापारी जगदीश शरद दसपुते (रा. कळवाडी, ता. मालेगाव) व अनिल श्रावण चौधरी (४४,रा. लोंढे, ता. चाळीसगाव) हे दुचाकीने झोडगे येथून कळवाडीला जात होते. यावेळी दोन दुचाकीवर आलेल्या चार संशयितपैकी दोघांनी रस्त्यावर दुचाकी आडवी लावली.

दशपुते यांच्या दुचाकीचा वेग कमी होताच चौघांनी अनिल व जगदीश यांना लाकडी दांडक्याने, लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली. जगदीश दसपुते यांच्याकडील कापूस विक्रीचे १२ लाख रुपये जबरीने हिसकावून नेले.

प्राथमिक उपचारानंतर जखमी अनिल चौधरी यांनी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Jalgaon Crime News : 5 वर्षांनंतर खटल्याचा निकाल; आरोपीला 7 वर्षे सश्रम कारावास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com