esakal | हेल्मेट नसलेल्यांनो! आता दोन तासांच्या समुपदेशनानंतरच सुटका
sakal

बोलून बातमी शोधा

no helmet

हेल्मेट नसलेल्यांनो! दोन तासांच्या समुपदेशनानंतरच सुटका

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : दुचाकी वाहनचालकांच्या (two wheeler) सुरक्षेसाठी पोलिस आयुक्त दीपक पांडे (police commissioner deepak pandey) यांनी हेल्मेट सक्तीचा (helmet compulsory) निर्णय घेतला आहे. मात्र त्यानंतरही अनेक जण हेल्मेट वापरत नसल्याचे पुढे आले आहे. त्यातच ऑगस्टमध्ये नऊ वाहनचालकांचे हेल्मेटअभावी मृत्यू झाल्याने पोलिसांनी विनाहेल्मेट दुचाकीचालकांना समुपदेशन प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे.

दुचाकीचालकांना समुपदेशन प्रमाणपत्र सक्तीचे

शहरात विनाहेल्मेट पकडलेल्या दुचाकीचालकांना पोलिस गाडीतूनच मुंबई नाका येथील ट्रॅफिक पार्कमध्ये नेले जाणार असून, तेथे दोन तासांचा समुपदेशन अभ्यास पूर्ण करावा लागणार आहे. दोन तासांच्या अभ्यासानंतरचे प्रमाणपत्र घेतल्यानंतर पुन्हा सुटका होणार आहे. शहर वाहतूक शाखेने हा निर्णय घेतला आहे. गुरुवार (ता.९)पासून शहरात या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. विनाहेल्मेटधारी चालकांवरील कारवाईसाठी पोलिसांनी भरारी पथके तयार केली आहेत. रस्त्यावर बॅरिकेडिंग करून अशा विनाहेल्मेटधारी चालकांचा शोध घेऊन पोलिस कारवाया करणार आहे. कारवाईत पकडलेल्या हेल्मेटधारकांना पकडून त्यांच्यावर कारवाया होणार आहेत.

हेही वाचा: यंदाचा बैलपोळा काळजात धस्स करणारा; एरंडगावात शोककळा

हेल्मेट नसलेल्यांनो! आता दोन तासांच्या समुपदेशनानंतरच सुटका

शहरात मुंबई नाका परिसरात नाशिक फर्स्ट संस्थेतर्फे वाहतूक पार्क उभारले आहे. तेथे वाहनचालकांना परवाना काढण्यापूर्वी प्रशिक्षणाची सुविधा असून, ऑनलाइन प्रमाणपत्र बंधनकारक आहे. त्याच धर्तीवर आता पुढचा भाग म्हणून विनाहेल्मेट चालकांना या केंद्रावर पोलिस गाडीतून आणले जाईल. त्यानंतर संबंधितांना वाहतूक पार्क केंद्रात दोन तासांचे समुपदेशन केले जाईल. समुपदेशन झाल्यानंतर तेथील प्रमाणपत्र दाखविल्यानंतर पोलिस जप्त केलेले वाहन परत करणार आहेत.

शहरात स्वातंत्र्य दिनापासून ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार सुरू केलेल्या उपक्रमानंतर ऑगस्टमध्ये हेल्मेट नसल्याने नऊ जणांचे बळी गेले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट सक्तीच्या निर्णयाची आणखी कडक अंमलबजावणी होणार आहे. - सीताराम गायकवाड, सहाय्यक पोलिस आयुक्त

हेही वाचा: टोमॅटो, कांदा, बटाटाचे ‘टॉप’चे भाव गडगडले! योजना कागदावरच

loading image
go to top