esakal | ह्रदयद्रावक! घरी लग्नाची धामधूम...अन् हळदीच्याच दिवशी प्रेमीयुगुलाला अग्निडाग..पित्यावर दुर्दैवी प्रसंग..
sakal

बोलून बातमी शोधा

new couple suicide.png

रवींद्रच्या घरी लग्नाची धामधूम सुरू होती. त्याच्या हळदीसाठी व मांडवासाठी वडिल आंब्याचे डहाळे तोडायला गेले. घरात लग्नाच्या निमित्ताने मंगलमय वातावरण असताना क्षणार्धात सर्वत्र स्मशानशांतता..कारण जे घडले ते भयंकर अन् मनाला चटका लावणारे होते. 

ह्रदयद्रावक! घरी लग्नाची धामधूम...अन् हळदीच्याच दिवशी प्रेमीयुगुलाला अग्निडाग..पित्यावर दुर्दैवी प्रसंग..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : बागलाण तालुक्याच्या आदिवासी पट्ट्यातील पठावे येथे राहणाऱ्या  रवींद्रच्या घरी लग्नाची धामधूम सुरू होती. त्याच्या हळदीसाठी व मांडवासाठी वडिल आंब्याचे डहाळे तोडायला गेले. घरात लग्नाच्या निमित्ताने मंगलमय वातावरण असताना क्षणार्धात पसरली सर्वत्र स्मशानशांतता..कारण जे घडले ते भयंकर अन् मनाला चटका लावणारे होते. 

अशी घडली धक्कादायक घटना...

रवींद्रच्या घरी लग्नाची धामधूम सुरू होती. त्याच्या हळदीसाठी व मांडवासाठी आंब्याचे डहाळे तोडायला गेलेल्या मंडळींनी दोघांचे मृतदेह आंब्याच्या झाडाला लटकलेले पाहिले. ही माहिती रवींद्रच्या वडिलांना समजताच त्यांनी हंबरडा फोडला. घरात लग्नाच्या निमित्ताने मंगलमय वातावरण असताना क्षणार्धात सर्वत्र स्मशानशांतता पसरली.पोलीसपाटील दयाराम पवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून सटाणा पोलीस स्टेशनला दूरध्वनीवरून खबर दिली. पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील, हवालदार प्रकाश जाधव, पोलीस नाईक जयंतसिंग सोळंके आदी घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांच्या मदतीने दोघांचे पार्थिव झाडावरून उतरवण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.अधिक तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रकाश जाधव करत आहेत.

हेही वाचा > "रेड झोन' आला आडवा...विवाहितेचा मुलासह आत्महत्येचा निर्णय..त्यावर वडिलांची युक्ती सफल!

कारण अस्पष्टच

नियतीच्या मनात काय दडले होते कुणास ठाऊक? त्याचे हळदीने अंग पिवळे करण्याअगोदरच वडिलांवर मुलाला अग्निडाग देण्याची दुर्दैवी वेळ आली. मागील काही वर्षांपासून पठावे दिगर परिसरात प्रेमीयुगुलांच्या आत्महत्या घडत आहेत. यामुळे परिसराची बदनामी होत आहे. पोलीस यंत्रणेमार्फत तसेच विविध स्वयंसेवी संस्थांमार्फत या घटनांना आळा घालण्यासाठी परिवर्तनाचे उपक्रम राबवावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

हेही वाचा > CM आदित्यनाथ यांना धमकाविणाऱ्या आणखी एकाला नाशिकमधून अटक...एटीएसची मोठी कारवाई

loading image
go to top