कोविड सेंटरमधील रुग्ण जेवण फेकताएत कचऱ्यात; धक्कादायक प्रकार समोर

covid hospital
covid hospitalesakal

नाशिक : सामान्यांसाठी कोरोना ही महामारी (corona pandemic) असली तरी काहींसाठी बक्कळ कमाईचा संधी आहे की काय, अशी शंका येऊ लागली आहे. अशातच कोवीड रुग्णांकडून हे जेवण थेट कचरा पेटीतच फेकले जात असल्याचे चित्र कोरोना सेंटरमध्ये पाहायला मिळते आहे. पण नेमके घडले तरी काय याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. (Meals-Covid-Center-thrown-directly-into-garbage)

जेवणाची स्थिती असमाधानकारक

नाशिक महापालिकेच्या नाशिक रोड येथील बिटको कोविड रुग्णालयातील जेवणाच्या दर्जावरुन आरोप-प्रत्यारोप झडत असताना इतर कोविड केंद्रातील जेवणाची स्थिती फार समाधानकारक नसल्याचे चित्र आहे. नासर्डी पुलाजवळील कोविड केंद्रात निकृष्ट दर्जाच्या जेवणामुळे तेथील रुग्णांवर नाइलाजाने भोजन फेकण्याची वेळ आली आहे. मिळणारे जेवण निकृष्ट असल्याने कोरोना सेंटरमधील रुग्णांना पोटदुखीचा त्रास सुरु झाला आहेत.

३३ रुग्णांच्या पोटदुखीच्या तक्रारी

कोविड सेंटरमधील जेवणाबाबत रुग्णांच्या प्रचंड तक्रारी आहेत. रुग्ण तेथील उपचाराबाबत समाधानी असले तरी, जेवणाचा दर्जा मात्र चांगला नसल्याने अनेकांना पोटदुखीचा त्रास सुरु झाल्याच्या तक्रारी आहे. सेंटरमधील ३३ कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात तक्रारी केल्या आहेत. सेंटरमधील भोजन निकृष्ट असते, भात कच्चा असतो, त्यामुळे बऱ्याच जणांची पोटदुखी होते. भाजी कच्ची असते. त्यात, मीठ कमी असते. पोळ्या कच्या असतात, जळालेल्या असतात. रुग्णांनी घरून बाहेरचा डब्बा आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे डबे बंद केले. त्यामुळे बाहेरून डब्बे आणण्यास परवानगी द्यावी. जेवणाचा दर्जा सुधारावा, चहा आणि नाश्ता कमी असल्याने रुग्णांना फळे, बिस्कीट मागविता येत नाही. रुग्णांच्या नातेवाइकांनी पदार्थ आणल्यास ते परत पाठवले जात असल्याच्या तक्रारी आहेत.

covid hospital
तिसऱ्या लाटेत बालरोगतज्ञांची भूमिका महत्त्वाची - छगन भुजबळ

कोरोनाबाधित म्हणतात...

उपचार चांगले असले तरी जेवणाबाबत मोठी हेळसांड होते. रोज घरी आपण जे जेवण बनवितो ते टाकून देताना वेदना होतात. -कोरोनाबाधित

जेवण निकृष्ट असते. कच्या पोळ्या, भात शिजलेला नसतो. जेवण घेणे अवघड आहे. याकडे लक्ष दिले पाहिजे. -कोरोनाबाधित

घरून जेवण आणता येत नाही आणि येथील जेवण खाता येत नाही. त्यामुळे आजारी पडण्याची वेळ आली आहे. -कोरोनाबाधित

जेवणाबाबत केंद्रातील सगळ्या रुग्णांनी लेखी स्वरूपात तक्रारी केल्या आहेत. -कोरोनाबाधित

covid hospital
कसमादे पट्ट्यात पूर्वमोसमीचा तडाखा; भाजीपाला, कांद्याचे मोठे नुकसान

या आहेत तक्रारी

- भाज्या कच्या असतात

- बाहेरील जेवण आणता येत नाही

- घरून डब्बे आणायला परवानगी नाही

- जेवणाचा दर्जा निकृष्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com