National Health Mission : वैद्यकीय सेवा सक्षम करण्यासाठी शहरात 106 उपकेंद्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal-Exclusive

National Health Mission : वैद्यकीय सेवा सक्षम करण्यासाठी शहरात 106 उपकेंद्र

नाशिक : महाराष्ट्र राज्यात नागरीकरणाचा वेग वाढत असला तरी ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागामध्ये शासनामार्फत पुरविल्या जाणाऱ्या वैद्यकीय (medical) सुविधांची अपूर्णता आहे. (Creation of 106 sub centres in city to enable medical services by Municipal Corporation under National Health Mission nashik news)

त्यामुळे ग्रामीण भागाच्या बरोबरीने वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी नाशिक महापालिका (NMC) हद्दीमध्ये १०६ आरोग्य उपकेंद्रांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून उपकेंद्रांची निर्मिती होणार आहे.

ग्रामीण भागात जिल्हा परिषद व जिल्हा रुग्णालयाच्या मार्फत वैद्यकीय सेवा पुरविली जाते. आरोग्य केंद्र व त्यानंतर उपकेंद्र मार्फत ग्रामीण भागाच्या कानाकोपऱ्यात सेवा पोचली आहे. शहरी भागात मात्र आरोग्य केंद्रापर्यंतच वैद्यकीय सेवा पुरविली जाते.

नाशिक महापालिका हद्दीमध्ये ३० उपकेंद्रे आहे. त्यापुढे वैद्यकीय सेवा पोचत नाही. महापालिकेचे रुग्णालय व आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून बाह्यरुग्ण विभागामार्फत वार्षिक ७० हजार रुग्णांची तपासणी होते, तर अंतर रुग्ण कक्षामध्ये २५००० रुग्णांवर उपचार केले जातात.

कोरोना पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा सक्षम करण्याच्या अनुषंगाने ग्रामीण भागाच्या धर्तीवर नाशिक महापालिका हद्दीमध्ये ३० केंद्रांना जोडून १०६ आरोग्य उपकेंद्रांची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी प्राथमिक तयारी करण्यात आली असून, पुढील सहा महिन्यात आरोग्य उपकेंद्रे अस्तित्वात येतील.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

असा असेल स्टाफ

१०६ आरोग्य उपकेंद्रांमध्ये प्रत्येकी केंद्रात एक एमबीबीएस डॉक्टर, एक स्टाफ नर्स, एक बहुउद्देशीय सेवक व एक सहाय्यक अशी नियुक्ती केली जाणार आहे. आरोग्य उपकेंद्रांसाठी महापालिका इमारत व पायाभूत सुविधा पुरविणार आहे. इमारतींच्या देखभाल व दुरुस्तीचा खर्च महापालिका स्वनिधीतून करेल.

या आजारांवर होणार उपचार

१०६ आरोग्य उपकेंद्राच्या माध्यमातून हायपर टेन्शन रक्तदाब मधुमेह तोंडाचा असतानाचा व गर्भाशय कर्करोग या आजारांवर उपचार केले जाणार आहे त्याचबरोबर सर्वेक्षण व उपचार हादेखील महत्त्वाचा भाग असेल. माता व बाल आरोग्य तपासणी या आरोग्य उपकेंद्रांच्या माध्यमातून होईल.

"ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात वैद्यकीय व आरोग्य सुविधांच्या पायाभूत सुविधा नाही. त्यामुळे ग्रामीण भागाच्या धर्तीवर शहरात १०६ उपकेंद्रे निर्माण केली जाणार आहे." - डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिकारी, महापालिका.