Nashik cricket
sakal
नाशिक: सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र सामन्याचा दुसरा दिवस थरारक राहिला. कान्हेरे मैदानावर खेळविल्या जात असलेल्या या सामन्यात दिवसभरात एकूण १७ बळींच्या मोबदल्यात २६६ धावा झाल्या. दिवसअखेर सौराष्ट्रच्या दुसऱ्या डावात पाच बाद ६० धावा झाल्या असून, संघाकडे १२९ धावांची आघाडी आहे. रंगत निर्माण झालेली असताना सामना निर्णायक ठरण्याची शक्यता वाढली.