Nashik News : शिवमहापुराण कथेमुळे क्रिकेटपटूंनी मैदान बदलले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Because of the Shiva Mahapuran story, the cricketers have shifted their march from the college ground to the field in front of Aram Hotel.----

Nashik News : शिवमहापुराण कथेमुळे क्रिकेटपटूंनी मैदान बदलले

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील पूर्व-पश्‍चिम भागातील खेळाडूंना खेळण्यासाठी कॉलेजचे मैदान शहरात सर्वांत मोठे आहे. या मैदानावर खेळाडू क्रिकेट, सायकल चालविणे, धावणे, फुटबॉल, हॉकी यांसह असंख्य खेळांचा सराव करत असतात. त्यामुळे मैदानावर दिवसभर खेळाडूंचा राबता असतो. प्रत्येक शुक्रवारी हे मैदान खेळाडूंनी भरलेले असते. अशा परिस्थितीत सध्या येथे पंडित श्री प्रदीपजी मिश्रा यांची श्री शिवमहापुराण कथा सुरू आहे. त्यामुळे क्रिकेटपटूंनी खेळण्यासाठी मुस्लिमबहुल पूर्व भागातील आराम हॉटेलसमोरील मैदानाची निवड केली आहे. ( Cricketers changed ground due to Shiva Mahapuran katha at malegaon Nashik News)

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

हेही वाचा: Mohammed Rafi Birthday: त्यांच्याकडे आहे रफींच्या 20 हजार गाण्यांचा खजिना! अर्धा पगार कॅसेट अन् रेकॉर्डरसाठी!

येथील कॉलेज मैदानावर श्री शिवमहापुराण कथा सुरू असल्याने क्रिकेटप्रेमी शहराजवळील मैदानावर क्रिकेट खेळत आहेत. शुक्रवारी शहरातील सर्व व्यवसाय व कामांना सुटी असते. त्यामुळे सुटीचा आनंद घेण्यासाठी नागरिक कुटुंबीयांसह हॉटेल, गार्डन आदी ठिकाणी जातात. तसेच, असंख्य तरुण येथील मैदानावर दर शुक्रवारी क्रिकेट खेळण्यासाठी जमा होतात. पूर्व भागातील तरुण टीम करून येथे क्रिकेट खेळतात.

त्यामुळे या मैदानावर गर्दी उसळते. मात्र येथील मैदानावर सध्या श्री शिवमहापुराण कथा सोहळा सुरू आहे. त्यामुळे येथील मैदानावर क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांनी आपला मोर्चा मुंबई-आग्रा महामार्गालगत आराम हॉटेलसमोरील मोठ्या प्रशस्त जागेत वळविला आहे. त्यामुळे सध्या या ठिकाणी लहान मुले व तरुणांची संख्या लक्षणीय असल्याचे बघावयास मिळत आहे.

हेही वाचा: Nashik News : दिंडोरी तालुक्यात बिबट्यांची दहशत! 2 दिवसापासून सलग दर्शन