Crime
sakal
नाशिक: आडगाव हद्दीतील बीडी कामगार नगरमध्ये हळदीच्या कार्यक्रमात नाचत असताना धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून संशयित टोळक्याने एका बेदम मारहाण केली. तर यावेळी एकाने धारदार कोयता काढून जीवे मारण्याच्याच उद्देशाने मारण्याचा प्रयत्न केला असता, युवकाने हाताने वार अडविला. मात्र कोयत्याचा वारात त्याच्या हाताची तर्जनी (करंगळी) मात्र तुटली. याप्रकरणी आडगाव पोलिसात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.