esakal | धक्कादायक! रक्षकच जेव्हा भक्षक बनतो तेव्हा; पोलिस पतीसह पाच जणांकडून पत्नीचा छळ
sakal

बोलून बातमी शोधा

maha..police.jpg

"तुझा पती पोलिस खात्यात असल्याने आमचे काही होणार नाही. तुला काय तक्रार करायची ती कर," असे सासरच्यांनी विवाहितेला सांगितले. कांचनचे पती महाराष्ट्र पोलिस दलात पालघर येथे कार्यरत असून, अनेकदा सुटीच्या दिवशीही घरी येत नसे. काय घडले नेमके वाचा..

धक्कादायक! रक्षकच जेव्हा भक्षक बनतो तेव्हा; पोलिस पतीसह पाच जणांकडून पत्नीचा छळ

sakal_logo
By
अजित देसाई

सिन्नर (जि.नाशिक) : "तुझा पती पोलिस खात्यात असल्याने आमचे काही होणार नाही. तुला काय तक्रार करायची ती कर," असे सासरच्यांनी विवाहितेला सांगितले. कांचनचे पती महाराष्ट्र पोलिस दलात पालघर येथे कार्यरत असून, अनेकदा सुटीच्या दिवशीही घरी येत नसे. काय घडले नेमके वाचा..

विवाहानंतर तीन महिने सुखाचे...त्यानंतर मात्र...

फर्दापूर (ता. सिन्नर) येथील शेतकरी रावसाहेब रानडे यांची कन्या कांचन हिचा विवाह ३१ मे २०१९ ला मुखेड (ता. येवला) येथील योगेश आहेर यांच्याशी झाला. विवाहानंतर तीन महिने सासरच्या मंडळींनी कांचनला चांगली वागणूक दिली. मात्र, त्यानंतर पती योगेश, सासू मंदाबाई यांनी बंगला बांधण्यासाठी दहा लाख रुपये व चारचाकी घेण्यासाठी आई-वडिलांकडून पाच लाख रुपये आणण्याचा तगादा लावला.

हेही वाचा > विवाह समारंभाला आलेल्या कुटुंबियांना बनविला निशाणा! दहा लाखांहून अधिक ऐवज लंपास

पैसे आणले तरच सासरी यायचे

कांचन यांनी याबाबत वडिलांना कळविले असता, परिस्थिती नसतानाही त्यांनी उसनवारीने ९१ हजार ८०० रुपये योगेश यांना आरटीजीएसद्वारे दिले. त्यानंतर काही दिवसांतच परत त्यांनी पैशांचा तगादा लावत कांचनला माहेरी पाठवून दिले. पैसे आणले तरच सासरी यायचे, असा दम सासरच्यांनी भरला. त्यामुळे कांचनने माहेरी येऊन वडिलांसह विवाह जमविणाऱ्यांनाही याबाबत सांगितले. त्या वेळी मध्यस्थींनी कांचनच्या सासरी जाऊन, यापुढे असे प्रकार होऊ देऊ नका, असे समजावले.

हेही वाचा > सिनेस्टाईल थरार! पोलिसांची चाहूल लागताच रिक्षाचालकाने ठोकली धूम; अखेर संशय खरा ठरला

तुझा पती पोलिस खात्यात असल्याने आमचे काही होणार नाही.

कांचनचे पती महाराष्ट्र पोलिस दलात पालघर येथे कार्यरत असून, अनेकदा सुटीच्या दिवशीही घरी येत नसे. मात्र, घरी आल्यावर दोन्ही नणंदा मुखेडला येत असत. जोपर्यंत ही माहेरून पैसे आणत नाही, तू हिला येथे ठेवू नको, फारकत देऊन टाक, असे त्या भाऊ योगेशला सांगत व कांचनला शिवीगाळ, मारहाण, दमदाटी करीत. या त्रासाबद्दल पोलिसांत तक्रार करणार असल्याचे सांगताच, तुझा पती पोलिस खात्यात असल्याने आमचे काही होणार नाही. तुला काय तक्रार करायची ती कर, असे सासरच्यांनी सांगितले. त्यानंतर

'सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे पत्र

कोरोना काळात पुन्हा माहेरी पाठवून दिल्यावर कांचनने ३ जूनला नाशिकच्या महिला सुरक्षा विभागात तक्रार दाखल केली. तरीही सासरच्यांनी नांदवण्यास नकार दिल्याने महिला सुरक्षा विभागाने २८ ऑक्टोबरला सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे पत्र वावी पोलिस ठाण्यात दिले. त्यानुसार कांचनचा पती योगेश, सासरे सुनील आहेर, सासू मंदाबाई आहेर, नणंद सोनाली विनोद डोकफोडे (रा. सिन्नर), मोनाली गणेश नागरे (रा. खेडलेझुंगे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. बंगला बांधण्यासाठी आणि चारचाकी घेण्यासाठी माहेरून पंधरा लाख रुपये आणावेत, यासाठी पत्नीचा छळ करणाऱ्या पोलिस पतीसह पाच जणांविरोधात वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

 

loading image
go to top