Nashik : अतिरिक्त बांधकाम प्रकरणी दोघा मॉल मालकांविद्ध गुन्हा

master mall extra construction
master mall extra constructionesakal

जुने नाशिक : महापालिकेकडून (NMC) मंजूर करण्यात आलेल्या नकाशाव्यतिरिक्त मास्टर मॉलचे अतिरिक्त बांधकाम (Extra Construction) केल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर नगररचना विभागाचे अधिकारी प्रदीप भामरे यांच्या तक्रारीवरून मॉलचे मालक राजू मोटवानी, श्याम मोटवानी यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा (Cyber) दाखल करण्यात आला. (Crime against two master mall owners in extra construction case Nashik news)

गंजमाळ येथील मास्टर मॉलला रविवारी (ता. १९) सायंकाळी पाचच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. मंगळवारी (ता. २१) सायंकाळी सहाच्या सुमारास आग आटोक्यात आली. मॉल तयार करताना महापालिकेकडून नकाशा मंजूर करून त्यांना परवानगी देण्यात आली होती; परंतु मंजूर नकाशाव्यतिरिक्त बांधकाम करण्यात आले होते. त्यामुळे प्रचंड अडचण निर्माण झाली. या अडचणीमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्रास झाला. जीवितहानी होण्याची शक्यता होती, सुदैवाने ती झाली नाही. या सर्व बाबींचा विचार करता महापालिकेकडून मॉलधारकांना मंजूर नकाशाव्यतिरिक्त बांधकाम काढून घेण्याची सूचना करण्यात आली होती.

master mall extra construction
पावसाळ्यातही 53 गावे-वस्त्यांची टँकर भागवताय तहान!

शिवाय मंजूर बांधकामाचाच वाणिज्य वापर करण्यास परवानगी देण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी पुन्हा पाहणी केली. त्यांना परिस्थिती ‘जैसे थे’ दिसून आली. त्यानंतर प्रदीप भामरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार भद्रकाली पोलिस ठाण्यात राजू मोटवानी आणि श्याम मोटवानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बेकायदा बांधकाम करणे त्यांना चांगलेच महागात पडले. आगीच्या घटनेत त्यांचे सुमारे कोटींचे नुकसान तर झालेच शिवाय त्यांच्यावर गुन्हादेखील दाखल झाला.

master mall extra construction
नाशकात धो-धो : मुसळधार पावसाने नागरिकांची फजिती; पाहा Photos

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com