Nashik : 5 जिल्ह्यांतून सराईताची तडीपारी

latest crime news
latest crime newsesakal

नाशिक : नाशिक रोड रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षेत्रात गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारास रेल्वे पाेलिसांनी सहा महिन्यांसाठी तडीपार केले आहे. विठ्ठल लहू भांगरे (वय २३, रा. नगर) असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असून, त्याला शिक्षाही झाली आहे. (criminal tadipar from 5 districts nashik Latest Crime News)

latest crime news
शिक्षक भरती आता MPSCच्या धर्तीवर; पुढील भरती नव्या पद्धतीनुसारच होणार

गुन्हेगारी प्रतिबंधक योजनेंतर्गत नाशिक रोड रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली. सराईत गुन्हेगार भांगरे याला यापूर्वी शिक्षाही झाली आहे. मात्र, त्याच्यात सुधारणा झाली नाही. रेल्वे हद्दीत त्याचा वावर वाढल्याने त्याच्यावर महाराष्ट्र पोलिस अधिनियमान्वये नाशिक, नगर, जळगाव, धुळे, औरंगाबाद या पाच जिल्ह्यांच्या हद्दीबाहेर सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचा प्रस्ताव सादर झाला होता.

पडताळणीअंती तो तडीपारीस पात्र ठरल्याने त्यास नाशिक रोड रेल्वे पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक महेश कुलकर्णी, सहाय्यक निरीक्षक बालाजी शेंडगे, गुन्हे पथकाचे हवालदार संतोष उफाडे, विजय कपिले, विलास इंगळे यांनी ताब्यात घेतले.

त्यानंतर सहाय्यक जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या समक्ष हजर केले. त्यांच्या आदेशानुसार त्यास पाच जिल्ह्यांच्या हद्दीबाहेर सहा महिन्यांसाठी हद्दपार केले आहे. नाशिक रोड रेल्वे पोलिसांची ही पहिलीच कारवाई असून, यानंतरही तडीपारीची कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी सांगितले.

latest crime news
नाईकवाडीपुऱ्यात पुरातन वृक्ष कोसळला; 7 घरांचे नुकसान, 1 जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com