Nashik Crime: देवपूरला बालिकेचे अपहरण अन तासाभरात सुखरूप सुटका

Missing Case
Missing Caseesakal

सिन्नर : सिन्नर तालुक्यातील देवपूर येथे मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास दोन वर्षीय बालिकेचे दुचाकीस्वारांनी अपहरण केल्याची घटना घडली होती.

सोशल मीडियावर या अपहरणाबाबत माहिती व्हायरल झाल्यावर बालिकेच्या शोधार्थ असंख्य तरुण रस्त्यावर उतरले. आपण चारही बाजूंनी घेरले जाऊ या भीतीपोटी अपहरण करताना बालिकेला कोणतीही इजा न करता तिला एका शेतात सोडून देत पोबारा केला.

तासाभरानंतर ही बालिका सुखरूप आढळून आल्यावर पोलिसांसह सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. (criminals abducted 4 year old girl in daytime Abandoned by roadside kidnappers absconded at Sinner devpur Nashik Crime)

देवपूर शिवारात जुन्या पांगरी-मीठसागरे रस्त्यावर शेतात राहणाऱ्या अविनाश वाणी यांची दोन वर्षांची मुलगी सान्वी ही घरासमोरच्या अंगणात खेळत असताना अचानक दोन दुचाकी येऊन थांबल्या. त्यातील एका दुचाकीवर बसलेल्या तरुणांनी तिला पळवून नेले.

हा प्रकार लक्षात आल्यावर घरातल्या मंडळींनी आरडाओरड केली. मात्र काही क्षणात दोनही दुचाकी पसार झाल्या होत्या. चिमुकल्या सान्वीचे अपहरण झाल्याची चर्चा देवपूर सह पांगरी,भोकणी, वडांगळी, पंचाळे, खोपडी, मीठसागरे, वावी या परिसरात सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाली.

त्यामुळे प्रत्येक ठिकाणी असंख्य स्थानिक तरुण कथित अपहरणकर्त्यांच्या शोधासाठी रस्त्यावर उतरले होते. देवपूर गावातील तरुणांनी गावातून बाहेर पडणाऱ्या सर्वच लहान मोठ्या रस्त्यांवरून शोध घेणे सुरु केले.

शिवार रस्ते देखील पालथे घालण्यात आले. घटनेची माहिती समजल्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामराव निकम, हवालदार विनोद इप्पर, भगवान शिंदे, स्वप्निल पवार यांनी धाव घेत देवपूरचा परिसर पिंजायला सुरुवात केली.

अपहरणकर्ते दुचाकीवरून आल्याचे प्रत्यक्ष दर्शींचे म्हणणे होते. त्या दृष्टीने पोलिसांनी सर्वत्र खबरदारीच्या सूचना दिल्या.

देवपूर-पंचाळे शिवारात विकास गडाख, बाळू खोले, डॉ. सागर वाणी हे शोध घेत असताना डांबरनाला परिसरात मुख्य रस्त्यापासून सुमारे अर्धा किलोमीटर आत चांगदेव थोरात यांच्या पडीत शेतामध्ये एक लहान मुलगी उभी असल्याचे दिसले.

Missing Case
Sawantwadi Crime : 'आयुष्यात स्ट्रगल करणं खूप कठीण आहे'; मित्राला 'मेसेज' पाठवून तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

या तिघांनी तिकडे धाव घेतली असता बांधाच्या पलीकडून सान्वी एकटी उभी होती. तिला उचलून घेत आजूबाजूला पाहिले असता कोणीच आढळून आले नाही.

सोशल मीडिया वरून सर्वत्र घटना व्हायरल झाल्यामुळे घाबरलेल्या अपहरण करताना तिला निर्जन स्थळी शेतात सोडून पळ काढला असावा.

सान्वी सुखरूप सापडल्याचे पोलिसांना आणि ग्रामस्थांना तात्काळ कळवण्यात आले त्यानंतर सर्वजण तिला घेऊन तिच्या घरी पोहोचले. यावेळी तिच्या आई-वडिलांना व नातेवाईकांना अश्रू अनावर झाले होते. तिला बघून आई-वडिलांना हुंदके आवरत नव्हते.

सान्वी हिचे वडील अविनाश मूळचे शेजारच्या फरदापुरचे. देवपूर शिवारात शेती असल्याने ते तिथेच स्थायिक झाले आहेत. शेती सोबतच त्यांचा ट्रॅक्टरच्या सहाय्याने जनावरांसाठी वैरण कुट्टी करून देण्याचा व्यवसाय आहे.

देवपूर सह पांगरी, पंचाळे शिवारात त्यांचा नेहमीच या व्यवसायानिमित्ताने वावर असतो. सरळ मार्गी असणाऱ्या अविनाशचे कोणाशी वैर देखील नाही. त्यामुळे मुलीचे अपहरण कोणत्या कारणासाठी झाले असावे याबाबत सर्वांच्या मनात प्रश्न होता.

"मुलीचे अपहरण झाल्यानंतर देवपूर गावातील तरुणांनी एकत्र येत मोठी शोध मोहीम राबवली. मुलगी सुखरूप सापडल्याचे श्रेय या तरुणांना आणि सोशल मीडियाचा योग्य आणि अचूक वेळी केलेला प्रभावी वापर याला देता येईल. या घटनेमागचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. मुलगी राहत असलेले ठिकाण मुख्य रस्त्यापासून आत मध्ये आहे तिथून नवख्या माणसाला बाहेर पडणे शक्य होत नाही. त्यामुळे परिसराची इत्यंभूत माहिती असणाऱ्यांनीच हे कृत्य केले असावे असे प्रथमदर्शनी दिसते." - शामराव निकम (पोलीस निरीक्षक, एमआयडीसी

Missing Case
Nanded Crime News : लूटमार करणाऱ्या आरोपीस आठ महिने कारावास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com