
चांदवड (जि. नाशिक) : शेतीला चारच तास वीज पुरवठा होतो आहे. पिकांना पाणी द्यायचे तरी कसे. आम्ही शेती करावी की नाही असा सवाल चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांना महावितरण कंपनीच्या कारभारामुळे पडला आहे. (Crops wither due to lack of power supply farmers in crisis at chandwad Nashik Latest Marathi News)
अस्मानी संकटाने बळीराजा पुरता होरपळलेला आहेच आता सुलतानी संकटाने चांदवड तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. विहीरीत काठोकाठ पाणी असूनही विजेअभावी पिकांना पाणी देता येईना. बाप भिक मागू देईना अन् आई पदर पसरु देईना अशी अवस्था चांदवड च्या अनेक गावांतील शेतकऱ्यांची झाली आहे. अगोदरच लोडशेडींग मुळे फक्त आठच तास थ्री फेज वीजपुरवठा केला जातो. आता फक्त चारच तास थ्री फेज वीजपुरवठा केला जातो आहे.
चारच तासांच्या वीजपुरवठ्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही.विहीरीत पाणी असूनही पाण्याअभावी पिके होरपळून चालली आहेत. डोळ्यांदेखत पिकांचे हाल शेतकऱ्यांना पाहवेना. अगोदर अतीवृष्टीमुळे पिकं खराब झालेली आहेत. आता कशीबशी पिकांना पोटच्या पोरावानी जीव लावून सुधारली होती त्यातच महावितरणच्या भोगंळ कारभारामुळे शेतीपंपांना थ्री फेज वीजपुरवठा नियमित केला जात नसल्याने पिके होरपळताय. दिवसा फक्त चारच वीजपुरवठा तोही सुरळीत नाही. इतर वेळा सिंगल फेज पुरवठा ही वेळेवर होत नाही.
तेव्हाही वीजेचा लंपडावच असतो.१३२ के.व्ही सब स्टेशनच्या ओव्हरलोड मुळे आठ तास विजपुरवठा होत नसल्याचे महावितरण चे अधिकारी सांगत आहेत. ओव्हरलोड मुळे घरगुती ग्राहकांनाही सुरळीत वीजपुरवठा होत नाही.बहुतांश वेळा रात्रीचे अंधारातच ग्रामिण भागातील नागरिकांना रहावे लागते. अंधारामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते . महावितरण कंपनीने शेतीला व घरगुती ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
"आम्हाला वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने रात्री अंधारात रहावे लागते. आमच्या आदीवासी वस्तीत लाइट नसल्यास साप, वींचू , कुत्रे अशा प्राण्यांची भितीतच आम्हाला रात्र काढावी लागते.आमचा वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल."
- सुनील मारुती पिंपळे, निमोण
"ओव्हरलोड मुळे १३२ के. व्ही सबस्टेशन वरूनच ट्रिपींग येत असल्यामुळे नाइलाजाने आम्हाला चार चार तास वीजपुरवठा करावा लागतो."- उमेश पाटील, उप अभियंता, उपविभाग चांदवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.