लसीकरण होतंय की संक्रमण! वणीत लसीकरण केंद्रावर तोबा गर्दी

वणी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात सुरु करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रात लस घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या रांगा लावला.
crowd for vaccination
crowd for vaccinatione-sakal

वणी (जि. नाशिक) : पांडाणे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येथे सुरु झालेल्या लसीकरण केंद्रावर(vaccination center) जिल्ह्यातील ठिकठिकाणाहून नागरिकांची उसळलेली तोबा गर्दी(crowd) आणि नागरिकांच्या बेशिस्तपणामुळे लसीकरण मोहिम ठप्प होत आहे. लसीकरणाऐवजी कोरोना संक्रमणाचीच अधिक भिती आहे. (crowd at Wani vaccination center)

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनुसार लसीकरण केंद्र शुक्रवार (ता. ७) पासून नव्याने सुरु करण्यात आले आहे. मात्र, लसीकरण केंद्रात कोविड(corona) लसीकरणासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सिंगचा(social distancing) फज्जा उडाला. दिवसभरात शंभर लसींचा पुरवठा झाल्याने लसीकरण न करताच अनेक नागरिकांना माघारी फिरावे लागले. परंतु, या दरम्यानच्या काळात जीव वाचवण्यासाठी लस घेण्याची धडपड करणाऱ्यांकडून जीवाशीच खेळ सुरू असल्याने संसर्गाचा(Infection) धोका वाढण्याची चिन्हे आहेत. वणीकरांची सातत्याने होणाऱ्या लसीकरण केंद्राच्या मागणीचा विचार करुन प्रशासनाने येथे वैद्यकिय अधिकारी डॉ. लक्ष्मण साबळे, आरोग्य निरीक्षक रमेश गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सुरु केले.

crowd for vaccination
कोरोनात औषधांचा काळाबाजार; कशी ओळखाल बनावट औषधं?

सकाळपासूनच होते केंद्रात गर्दी

वणी येथे १८ वयोगटावरील लसीकरण सुरु झाल्याचे कळताच वणीसह, नाशिक, ओझर, पिंपळगाव, अभोणा, कळवण तसेच तालुकाभरातील काही नागरिकांनी एकच गर्दी केली होती. महाविद्यालयाच्या आवारात नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुरुवातीला लसीकरणाला नागरिकांकडून प्रतिसाद(response) मिळत नव्हता. परंतु, लसीकरण झालेल्या नागरिकांची कोरोना प्रतिबंधक शक्ती वाढल्याचे दिसून आल्याने नागरिकांना कोविड लसीचे महत्व(importance) समजले. लसीकरण हा एकमेव उपाय असल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लस घेण्यासाठी सकाळपासून आरोग्य केंद्रात गर्दी केली होती. परंतु, पहिला डोस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती. या वेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रवीण उदे, पोलिस उपनिरीक्षक रतन पगार यांनी बंदोबस्त ठेवला असला तरी नागरिक नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करीत होते.

crowd for vaccination
प्रचंड इच्छाशक्तीपुढे हरला कोरोना! तब्बल ३८ दिवसांची झुंज यशस्वी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com