esakal | अंबासन : लसीकरणादरम्यान गर्दी अन् गोंधळ; सोशल डिस्टंसिंगचा फज्जा
sakal

बोलून बातमी शोधा

crowd during vaccination

अंबासन : लसीकरणादरम्यान गोंधळ; सोशल डिस्टंसिंगचा फज्जा

sakal_logo
By
दिपक खैरनार

अंबासन (जि.नाशिक) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नियोजनाअभावी लसीकरणादरम्यान (Vaccination) मोठा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे एकाही नागरिकाच्या तोंडावर मास्क (Mask) लावलेला नव्हता. अठरा वर्ष वयोगटातील तरूणांसह पुढील वयोगटातील नागरिकांना लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते.

मास्क कुणी घालेना...

प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण करताना नियोजनअभावी नेहमीच गोंधळाची परिस्थितीत निर्माण होत असल्याचे चित्र आहे. यात गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य कर्मचारी व ग्रामपंचायत प्रशासन हतबल होताना दिसून आले आहेत. लसीकरणादरम्यान एकाही नागरिकांकडून मास्कचा वापर केला गेला नसल्याने कोरोना (Corona) हद्दपार झाला की काय असेच दिसून येत होते. पहाटेपासून लसीकरणास नागरिकांकडून रांगा लागल्या होत्या सुरूवातीला अतिशय सुरळीत चाललेल्या लसीकरणास अचानक गर्दी वाढल्याने एकच गोंधळ उडाल्याचे चित्र होते.

हेही वाचा: चाळिशीनंतर लायसन्स काढायचंय? 'हे' असेल आवश्यक!

तरूण वर्ग प्राथमिक आरोग्य केंद्रातील खिडकीवर लसीकरण ऑनलाईन नोंदणीसाठी लटकत मोठी गर्दी करीत होते. दरम्यान बरेचजण बाहेरगावाहून लसीकरणासाठी उपस्थित झाल्याचे दिसून आले होते. आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून सर्वांना लस दिली जाईल फक्त गर्दी करू नये अशी विनवणी करीत होते. मात्र अतीउत्साही तरूण मंडळी कोणाचे ऐकेन. यात एका माजी ग्रामपंचायत सदस्यानेही तरूणांचा विनाकारण घोळका मांडून बसल्याचे निदर्शनास आले असून काहींनी वशिलेबाजी दाखवल्याची चर्चा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात होत होती.

हेही वाचा: नाशिकच्या कांद्याची स्पर्धा! सिंगापूर-मलेशियामध्ये बोलबाला

loading image
go to top