esakal | चाळिशीनंतर लायसन्स काढतायं? 'हे' प्रमाणपत्र असेल आवश्यक!
sakal

बोलून बातमी शोधा

License

चाळिशीनंतर लायसन्स काढायचंय? 'हे' असेल आवश्यक!

sakal_logo
By
योगेश मोरे

म्हसरूळ (जि.नाशिक) : वाहन चालविण्यासाठी परवाना आवश्यक असतो. त्यातच प्रादेशिक परिवहन विभागातर्फे (RTO) सर्वच कामे ऑनलाइन होत असून, वाहन परवाना काढण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाने घरबसल्या लर्निंग लायसन्स (learning license) काढण्यासाठी फेसलेस (faceless) १४ जूनपासून सेवा सुरू केली आहे. यासोबत वयाच्या चाळिशीनंतर वाहन परवाना काढण्यासाठी फिटनेस प्रमाणपत्र ऑनलाइन आवश्यक आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी दिली.

डॉक्टरांना आरटीओकडून मिळणार पासवर्ड

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) एमबीबीएस डॉक्टरकडून लॉग इन आणि पासवर्ड दिला जाणार आहे. संबंधित डॉक्टरने लायसन्स काढण्यासाठी अर्ज करणारा उमेदवार सुदृढ असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर चाळिशीनंतरच्या उमेदवाराला लायसन्स व लायसन्स नूतनीकरण करून दिले जाणार आहे. वाहन व वाहनचालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लर्निंग लायसन्स काढण्याची संख्याही वाढत आहे. यातच मागील वर्षांपासून कोरोनामुळे लायसन्स काढण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले होते. आरटीओ एजंटकडूनही लायसन्स काढणाऱ्यांची पिळवणूक होत असल्याने आरटीओचा सर्वच कारभार आता ऑनलाइन होत आहे. १६ वर्ष पूर्ण झाल्यानंतर विनागियर दुचाकी, तर १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर व्यक्ती सुदृढ असेपर्यंत लायसन्स ऑनलाइनची सुविधा आरटीओकडून देण्यात आली आहे, तर चाळिशीनंतर वाहन परवाना काढण्यासाठी एमबीबीएस डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले असून, एमबीबीएस डॉक्टरांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे, प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भागवत यांनी केले आहे.

हेही वाचा: नाशिक : आसारामबापू आश्रमाच्या संचालकाला अटक

हेही वाचा: नाशिकच्या कांद्याची स्पर्धा! सिंगापूर-मलेशियामध्ये बोलबाला

loading image
go to top