Nashik : आला हिवाळा, जॉगिंगला चला..; पिंपळगावला मैदानावर नागरिकांची गर्दी

Youths practicing running for police recruitment on the grounds of Wagh College.
Youths practicing running for police recruitment on the grounds of Wagh College.esakal

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : पावसाळा संपताच जिल्ह्यात सर्वत्र गुलाबी थंडीची चाहुल लागली आहे. थंडीच्या काळात व्यायामाची मज्जाच वेगळीच असते. आरोग्याच्या दृष्टीने या काळात पोषक खाणे, चांगला व्यायाम करण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. यामुळे थंडी सुरु होताच पिंपळगाव शहरातील व्यायामाची ठिकाणे, जीम, जॉंगिगचे रस्ते लोकांच्या गर्दीने गजबजू लागले आहेत. (Crowd of citizens on Pimpalgaon Maidan for exercise in winter nashik Latest Marathi News)

गेल्या काही दिवसापासून पारा घसल्याने थंडी सुरु झाली आहे. या ऋतुमध्ये व्यायाम करणे अधिक फायदेशीर असल्याने पिंपळगाव मध्ये आता जॉगिंगसाठी पहाटेपासून लोक फिरताना दिसत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शहराच्या काही वॉर्डमध्ये असलेल्या उद्यानात जॉगिंग ट्रॅक आहेत. तिथेही सकाळ आणि सायंकाळी फिरण्यासाठी लोक गर्दी करत आहे. तसेच पहाटेच्या सुमारास सोयीनुसार महामार्गच्या कडेने लोक फेरफटका मारत आहे.

पिंपळगाव शहरात वाघ महाविद्यालय व पिंपळगाव हायस्कूलचे मैदान जॉगिंगसाठी आवडते ठिकाण आहे. आता चिंचखेड रस्त्यावरील स्व. बनकर उद्यान, शिवाजी नगर, घोडके नगर येथे उद्यानात ट्रॅक झाल्याने नागरिक व्यायामासाठी याठिकाणी गर्दी करू लागले आहे. शहराची वाढतील लोकसंख्या पाहता शहरात आणखी जॉगिंग ट्रक आणि उद्याने यांचा विकास करण्याची मागणी आता नागरिकांमधून केली जात आहे.

Youths practicing running for police recruitment on the grounds of Wagh College.
Winter Skincare : हिवाळ्यासाठी खोबरेलतेल वरदान!; खोबरेलतेल ठेवते त्‍वचा मुलायम!

भरतीची तयारी

राज्य शासनातर्फे पोलिस दलात भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. भरतीसाठी मैदानी चाचणी पास होण्यासाठी पिंपळगाव मधून तरुण, तरुणी यांची देखील मैदानावर गर्दी वाढू लागली आहे. यामुळे वाघ महाविद्यालय व पिंपळगाव हायस्कूलचे मैदाने या भावी पोलिसांबरोबर नागरिकांच्या गर्दीने भरू लागले आहे.

"वाघ महाविद्यालयाच्या मैदानांवर तास भर फिरण्यासाठी मी येत असतो. याठिकाणी फिरण्यासाठी जॉगिंग ट्रॅक असल्याने चालणे सुरक्षीत असते. ट्रक लगत वृक्षारोपण केलेले असल्याने मन प्रसन्न राहण्यात मदत होते.:"

- अरुण लभडे (संचालक, जॉइंट फार्मिंग सोसायटी)

Youths practicing running for police recruitment on the grounds of Wagh College.
School Nutrition Scheme : महागाईत खिचडीला किरकोळ दरवाढीची फोडणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com