esakal | पर्यटनस्थळी बंदी असतानाही इगतपुरीत पर्यटकांची गर्दी!
sakal

बोलून बातमी शोधा

crowd-of-tourists-in-igatpuri

नाशिक ग्रामीण वाहतुक शाखेचे पोलीस कर्मचारी येथील स्थानिक नागरिकांना अरेरावीची भाषा वापरत असल्याने स्थानिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे

पर्यटनस्थळी बंदी असतानाही इगतपुरीत पर्यटकांची गर्दी!

sakal_logo
By
पोपट गंवादे

इगतपुरी (जि. नाशिक) : कोरोनाच्या (Corona virus) पार्श्वभुमीवर पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी असतानाही शनिवार (ता. १०) रोजी इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे दिसून आले. शनिवार व रविवारी पुर्णता: लॉकडाऊन (Lockdown) केलेले आहे. पर्यटन स्थळावर पर्यटक जाऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाने देखील मोठ्या प्रमाणात सावधगिरी बाळगत बंदोबस्त लावलेला आहे. (crowd-of-tourists-in-igatpuri-nashik-marathi-news)

पोलीस-स्थानिकांत वाद

पर्यटन स्थळावरती शनिवार आणि रविवार जमावबंदी असल्यामुळे कोणत्याही प्रकारची गर्दी होऊ नये यासाठी नाशिक ग्रामीण वाहतुक शाखेच्या पोलिसांनी भावली धरणाकडे जाणाऱ्या पिंप्रीसदो फाटा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचारी तैनात केले आहेत.

या ठिकाणी कोणालाच भावली धरणाकडे जाऊ दिले जात नाही. मात्र याचा फटका पिंप्रीसदो, भावली, आंबेवाडी, जामुंडे, गव्हांडा येथील स्थानिक नागरिक, हॉटेल व्यवसायिकांना बसत आहे. यामुळे काही स्थानिक नागरिक, भावली धरण परिसरातील मोठे व्यवसायिक, पर्यटक आणि पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये मोठया प्रमाणात वाद होत असल्याचा प्रकार देखील येथे पहावयास मिळत आहेत. नाशिक ग्रामीण वाहतुक शाखेचे पोलीस कर्मचारी येथील स्थानिक नागरिकांना अरेरावीची भाषा वापरत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली जात आहे. तर काही पोलीस कर्मचारी पर्यटकांकडुन पैसे घेऊन सोडत असल्याचे स्थानिक वाहन चालक सांगत असुन त्यामुळे स्थानिक वाहन चालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा: मालेगावात लुटीच्या उद्देशाने पिक-अपवर गोळीबार; एक जखमी

पर्यटकांनी प्रशासनाला सहकार्य करावे

वाद टाळण्यासाठी या ठिकाणी स्थानिक पोलिसांची नियुक्ती केली जावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. त्याचप्रमाणे नाशिक ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी तालुक्यातील वाडीव-हे फाट्यावर वाहन तपासणीच्या नावाखाली नाकाबंदी करून वाहन चालकांना त्रास देत पैशाची मागणी करत असल्याचा प्रकार नाव न सांगण्याच्या बोलीवर एका वाहन चालकाने सांगितल आहे. तसेच पर्यटकांनी देखील पोलिस प्रशासनाला सहकार्य करणे अपेक्षित आहे.

(crowd-of-tourists-in-igatpuri-nashik-marathi-news)

हेही वाचा: येवल्यात सहा महिन्यांत फक्त ३८ हजार नागरिकांचे लसीकरण

loading image