esakal | VIDEO : गौरी-गणपतीच्या सणासाठी सजली बाजारपेठ...! देखण्या 'गौराई'चे रुप पहा
sakal

बोलून बातमी शोधा

gauri ganpati.jpg

शनिवारी (ता. 22) रोजी गणरायाचे तर मंगळवारी (ता. २९) महालक्ष्मीचे आगमन होत आहे. या निमित्ताने सर्वत्र जय्यत तयारीला सुरुवात झाली असून, गौरी-गणपतीच्या स्वागतासाठी बाजारपेठ सजली आहे. सण-उत्सवांमध्ये सर्वात जास्त महत्त्व असते ते सजावटीला. त्यामुळेच गणेशाच्या मूर्ती, महालक्ष्मीचे मुखवटे यांच्या इतकीच मागणी सजावटीच्या साहित्यालाही दिसून येत आहे.

VIDEO : गौरी-गणपतीच्या सणासाठी सजली बाजारपेठ...! देखण्या 'गौराई'चे रुप पहा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : कोरोना अन् लॉकडाउनमुळे सुन्या-सुन्या झालेल्या बाजारपेठा पुन्हा नव्या जोमाने सक्रिय झाल्या आहेत. गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आल्याने गणेशमूर्ती, सजावटीचे साहित्य, गौरींचे मुखवटे, साड्या, दागिन्यांनी मध्यवर्ती नाशिकमधील बाजारपेठा सजल्या आहे. विक्रेत्यांनी असंख्य प्रकारचे साहित्य घेऊन दुकाने सजवली आहेत. आता त्यांना प्रतीक्षा आहे ती ग्राहकांची!

विविधरंगी वस्तूंनी बाजारपेठ फुलली

श्रावण अमावास्या अर्थातच पोळा सण साजरा करून श्रावणोत्सव संपला आणि भाद्रपदाच्या आगमनाने सर्वांना गणरायाचे आणि महालक्ष्मीच्या उत्सवाचे वेध लागले. अवघ्या चार दिवसांवर गौरी-गणपतीचा सण येऊन ठेपला आहे. शनिवारी (ता. 22) रोजी गणरायाचे तर मंगळवारी (ता. २९) महालक्ष्मीचे आगमन होत आहे. या निमित्ताने सर्वत्र जय्यत तयारीला सुरुवात झाली असून, गौरी-गणपतीच्या स्वागतासाठी बाजारपेठ सजली आहे. सण-उत्सवांमध्ये सर्वात जास्त महत्त्व असते ते सजावटीला. त्यामुळेच गणेशाच्या मूर्ती, महालक्ष्मीचे मुखवटे यांच्या इतकीच मागणी सजावटीच्या साहित्यालाही दिसून येत आहे. गणपती आणि महालक्ष्मीला लागणारे वेगवेगळे हार, मुकुट, पूजेचे आकर्षक सामान, वेगवेगळ्या प्रकारचे मखर, विविध प्रकारची तोरणे अशा विविधरंगी वस्तूंनी बाजारपेठ फुलून गेली आहे. 

हेही वाचा > दुर्दैवी! बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला अचानक आलेल्या 'त्या' बातमीने ममदापूर हळहळले..काय घडले नेमके?

आकर्षक दागिनेही महिला वर्गाला खुणावताय

गणपतीसाठी थर्माकोल मखर ऐवजी हॅण्डमेड मखर यांना विशेष मागणी असल्याचे दिसून येते. यामध्ये मंदिर, कमळ, सिंहासन असे विविध आकार उपलब्ध आहेत. १५० रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंत याच्या किंमती दिसून येत आहेत. महालक्ष्मीसाठी कापडी मखरांमध्ये विविध प्रकार पाहायला मिळतात. गौरी-गणपतीसाठीचे अनेक आकर्षक दागिनेही महिला वर्गाला खुणावत आहेत. मोत्यांचे, फुलांचे हार आणि या हारांना मध्यभागी मोठे पदक असे आपण नेहमीच पाहतो; पण यंदा मात्र हिरव्या पानांचे हार आणि पदकाच्या जागी आंबा, सफरचंद, संत्री या फळांचे पदक असे नावीन्यपूर्ण हार बाजारात आले आहेत. याशिवाय महालक्ष्मीच्या साड्या, कपडे यांचे असंख्य प्रकार बाजारात पाहायला मिळतात.

हेही वाचा > धाबे दणाणले! नियुक्ती होऊनही उमेदवार कामावर नाही?कारवाई तर होणारच

संपादन - किशोरी वाघ

loading image
go to top