नाशिकच्या सांस्कृतिक उत्थानावर चर्चा होणे गरजेचे : राज्यपाल कोश्यारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cultural upliftment of Nashik needs to be discussed Governor Koshyari

नाशिकच्या सांस्कृतिक उत्थानावर चर्चा होणे गरजेचे : राज्यपाल कोश्यारी

सिन्नर (जि. नाशिक) : राज्यपाल श्री. कोश्यारी हे नाशिक जिल्ह्यात दोन दिवसीय दौऱ्यासाठी आले आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आज सिन्नर येथील गारगोटी संग्रहालयास भेट देवून पाहणी केली. रोजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला थोडा विरंगुळाही गरजेचा असतो. गारगोटी संग्रहालयाला दिलेल्या भेटीतून धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडल्याचा आनंद द्विगुणित केला आहे. नाशिकला सांस्कृतिक वारसा मोठा आहे. गारगोटी संग्रहालयातून सांस्कृतिक ठेव्यांचे जतन करण्यात येत असून येत्या काळात नाशिकच्या सांस्कृतिक उत्थानावर चर्चा होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केले.

नाशिक, त्र्यंबकेश्वरला पौराणिक व ऐतिहासिक वारसा मोठा आहे. गारगोटी संग्रहालयाची सुंदरता बघून आज सांस्कृतिक उत्थानावर खऱ्या अर्थाने चर्चा करण्याची गरज असल्याची भावना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली. संग्रहालयाच्या दोन्ही दालनातील गारगोटीतून साकारलेल्या वृक्षांच्या प्रतिकृती, देवदेवता व महात्म्यांचे गारगोटी शिल्प, फुलदाणी यांची पाहणी केली. यानंतर गारगोटी संग्रहालयातील वरील दालनातील विक्री कक्षास राज्यपाल कोश्यारी यांनी भेट दिली. या दालनात गारगोटीपासून बनिवेले दागिने, शिल्प, शोभेच्या वस्तू व ब्रेसलेट, स्फटीकांपासून बनविलेल्या माळा विक्रीस ठेवलेल्या आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात तसेच परदेशातून उत्खननादरम्यान सापडलेल्या गारगोटीचे नानाविध आकार व रंगातील मनमोहक अश्म शिल्पे पाहून राज्यपाल प्रभावित झाले.

हेही वाचा: बिबट्याकडून बळीराजाचे पशुधन फस्त; वन विभाग मात्र सुस्त | Nashik

यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, तहसीलदार राहुल कोताडे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे, गारगोटी संग्रहालयाचे संस्थापक के. सी. पांडे, संचालक अंकीत पांडे यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा: पाच महिन्यानंतर आझाद मैदानात निरव शांतता; आंदोलनाच्या खाणाखुणा कायम

आर्टिलरीच्या बँड पथकाने केले स्वागत...

नाशिक रोडच्या आर्टिलरी सेंटर येथील पथकाने राज्यपाल श्री कोषारी यांचे गारगोटी संग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर स्वागत केले. देशभक्तीपर गीतांची धून यावेळी वाजविण्यात आली.

'ती' घटना अशोभनीय

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय मंत्री व खासदार शरद पवार पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांकडून झालेल्या हल्ल्याच्या घटनेबाबत विचारले असता हा प्रकार अशोभनीय असल्याचे मत राज्यपालांनी मांडले. अशा प्रकारच्या घटनांनी महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत असून राज्य शासना कडून याप्रकरणात उचित कारवाई होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Cultural Upliftment Of Nashik Needs To Be Discussed Governor Koshyari Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..