Cyber Fraud
sakal
नाशिक
Nashik Cyber Fraud : सावधान नाशिककर! वर्षभरात सायबर भामट्यांनी मारला ५७ कोटींवर डल्ला; शेअर मार्केटच्या नावाने सर्वाधिक लूट
Cyber Fraud Cases Rise in Nashik : गतवर्षभरात सायबर भामट्यांनी नाशिककरांच्या सुमारे ५७ कोटींवर डल्ला मारला आहे. २०२४ च्या तुलनेत गतवर्षी पावणेचार कोटींची फसवणूक अधिकची झाली आहे.
नाशिक: दिवसेंदिवस ऑनलाइनच्या माध्यमातून सायबर फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. पोलिसांकडून सातत्याने जागरूकता केली जात असतानाही सुशिक्षित, उच्चशिक्षित सायबर भामट्यांनी दाखविलेल्या लोभाचे बळी ठरत आहेत. गतवर्षभरात सायबर भामट्यांनी नाशिककरांच्या सुमारे ५७ कोटींवर डल्ला मारला आहे.
