नाशिक: सायबर भामट्यांनी शहरातील चौघांना शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग व आयपीओच्या खरेदीतून जादा परताव्याचे आमिष दाखवून तब्बल २८ लाखांना गंडा घातला आहे. सचिन जनार्दन सानप (रा. स्वामी विवेकानंदनगर, राणेनगर, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, ते खासगी नोकरदार आहेत. २१ जूनपासून संशयित सायबर भामट्यांनी सानप यांना व्हॉटसॲपसह टेलिग्राम, इन्स्ट्राग्राम या सोशल मीडियावरून संपर्क साधला होता.