नाशिक- सायबर फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी वारंवार जनजागृती केली जात असतानाही शहरातील चौघांना सायबर ठगांनी तब्बल ५५ लाखांना गंडा घातला आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून सायबर ठगांनी फसवणूक केली आहे. याप्रकरणी शहर सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.