नाशिक- पोलिस ठाण्यांकडून प्रलंबित तक्रार अर्जांचा निपटारा (झिरो पेडन्सी) करण्याचे आदेश असताना शहर सायबर पोलिस ठाण्याच्या तपासणीमध्ये गेल्या चार वर्षातील दहा तक्रारी अर्ज प्रलंबित असल्याचे गुन्हेशाखेच्या उपायुक्तांच्या निदर्शनास आले. या अर्जांनुसार तब्बल एक कोटी १३ लाखांची फसवणुकीची दखल सायबर पोलिसांकडून घेण्यात आलेली नाही. त्यावरून उपायुक्तांनी सायबर पोलिसांची कानउघाडणी केली. त्यानुसार गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.